अल्टरनेट करंट किंवा डी सी करंट या प्रकारातून मोटारगाडीची ही बॅटरी चार्ज करता येते. त्यासाठी तशी रचना मोटारगाडीला दिलेली असते. नेहमीची पेट्रोल-डिझेलवर चालणारी मोटारगाडी विजेवरही चालण्यासाठी रूपांतरित केली जाते, त्यातही त्या त्या देशातील व्यवस्थेप्रमाणे चार्ज कशा प्रकारे होते, ती बाब लक्षात घेतली जाते व तशी सोय मोटारीमध्ये केली जाते. किती व्होल्टेज, व्ॉट, करंट कितीचा आहे.त्यामुळे चार्जिगला किती वेळ लागेल, चार्जिग सर्वसाधारण कसे करावे, कधी करावे याचेही नियम असतात..

मोटारीचे इंधन म्हणून डिझेल, पेट्रोल वापरले जाते. वाढत्या वाहनसंख्येबरोबरच या इंधनाचा साठा संपुष्टात येणार, ते इंधन महाग होत जाणार हे स्पष्ट असल्यानेच पर्यायी इंधनाचे शोध कधीपासूनच चालू झाले आहेत. त्यात एलपीजी व सीएनजी हे पेट्रोलसारख्या खनिज साठय़ावरील इंधनप्रकारही अलीकडेच भारतात आले आहेत. पण अजूनही त्यांची उपलब्धता केवळ काही शहरांमध्येच आहे, इतकेच नव्हे तर त्यांची विद्यमान उपलब्धता ही देखील रेशनिंग केल्यासारखी आहे. सरकारी स्तरावर या पर्यायी व स्वस्त अशा इंधनाचे वितरणही नीट नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. या खनिजसाठय़ांशी निगडित असलेल्या इंधनाला पर्याय म्हणून विजेचा विचार केला जातो. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा कशा चालतात हे प्राथमिक स्वरुपात गेल्या लेखात पाहिले. पण त्या विजेवरील इंधनाला ज्या प्रकारे मोटारगाडीत वापरले जाते, त्यांचा साठा मोटार चालण्यासाठी होतो, त्या चार्जिगच्या बॅटऱ्यांचेही प्राथमिक प्रकार आहेत. त्यामध्येही आता आधुनिक अशा लिथियम आयन बॅटऱ्या कार्यक्षम ठरल्या आहेत. हा एक विजेवर चालणाऱ्या मोटारींच्या विकासातील एक टप्पा झाला.
प्रत्यक्षात व्यावहारिक स्थिती कशी असेल, ती बाब तशी मोठय़ा प्रमाणात युरोपात, अमेरिकेत सिद्ध होऊ लागली आहे. अनेक नामांकित मोटार उत्पादक कंपन्यांनी आपल्या विजेवरील मोटारी किंवा हायब्रीड म्हणजे विजेवर आणि पेट्रोल-डिझेलवरही चालतीय अशा मोटारी निर्माण केल्या आहेत. त्यामध्ये अद्यापही तशी परिपूर्णता आलेली आहे, असे म्हणता येणार नाही. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ांच्या या उत्क्रांतिमार्गातील हा एक टप्पा असून तो चांगल्या स्तरावर येऊन ठेपला आहे, हे मात्र नक्की. भारताच्या दृष्टीने मात्र अद्याप ‘दिल्ली बहोत दूर है’ अशीच स्थिती आहे.
मोटारींना विजेची ही ऊर्जा ज्यामुळे मिळणार आहे, ती म्हणजे चार्ज होणाऱ्या या बॅटऱ्या वा सेल्स व त्यांना चार्ज करण्यासाठी विद्युतभारित करण्यासाठी जी पद्धत युरोपातील देशांमध्ये आहे, त्या बद्दल या संशोधनाच्या टप्प्याला, संशोधनाला व त्या वितरणकार्यपद्धतीला मानाचा मुजरा करावा लागेल. विजेच्या मोटारी प्रभावीपणे वापरणाऱ्या लोकांनाही तो मानाचा मुजरा असेल. अजूनही भारतातील विद्यमान मोटारींचा वापर करण्यासंबंधात असणारी स्थिती पाहिली तर तेथे बौद्धिक साक्षरतेची गरज आहे, असे म्हणावे लागते.
विजेवर चालणारी मोटारगाडी विद्युतभारित करण्यासाठी सर्साधारण घरी मिळणाऱ्या विजेच्या जोडणीमधील सॉकेट-प्लगद्वारेही चार्ज करता येते. मोटारीला त्यासाठी विशिष्ट प्रकारचा चार्जरही लागतो. एक तर तो चार्जर तुम्हाला मोटारीबरोबरही संलग्न केलेल्या पद्धतीत मिळतो वा मोटारीत तशी सोय करून घ्यावी लागते, किंवा तुम्ही तो घरी तुमच्या वीज जोडणीवरही करू शकता त्यासाठी वेगळी कार्ययंत्रणा तेथे ठेवावी लागते. एक प्रकारचे हे वीजेचे सर्किट असते.
अल्टरनेट करंट किंवा डी सी करंट या प्रकारातून मोटारगाडीची ही बॅटरी चार्ज करता येते. त्यासाठी तशी रचना मोटारगाडीला दिलेली असते. नेहमीची पेट्रोल-डिझेलवर चालणारी मोटारगाडी विजेवरही चालण्यासाठी रूपांतरित केली जाते, त्यातही त्या त्या देशातील व्यवस्थेप्रमाणे चार्ज कशा प्रकारे होते, ती बाब लक्षात घेतली जाते व तशी सोय मोटारीमध्ये केली जाते. किती व्होल्टेज, व्ॉट, करंट कितीचा आहे.त्यामुळे चार्जिगला किती वेळ लागेल, चार्जिग सर्वसाधारण कसे करावे, कधी करावे याचेही नियम असतात. अशा वेळी विजेवर चालणारी ही मोटारगाडी हे एक विद्युत उपकरण असते हे पक्के लक्षात ठेवावे लागते.  विजेवर मोटार चालू शकते. ती स्वस्त इंधन म्हणून मानली जात आहे ही बाब खरी असली तरी त्या विजेच्या मोटारीचा व विद्युत ऊर्जेचा वापर किती सावधपणे व दक्षतेने करायला लागेल हे लक्षात घ्यायला लागते.
झटकन पेट्रोल भरले जाते तसे हे चार्जिग नसते. त्याला काही वेळ द्यावा लागतो. दुसरी बाब अशी की ज्यावेळी तुम्हाला पेट्रोल भरावयाचे असते तेव्हा तुम्हाला आवश्यक तितके पेट्रोल, तुमच्या खिशाला परवडणारे व वेळेत भरता येते अशी स्थिती असते. पेट्रोल-डिझेल भरताना लागणारा वेळ व विजेवर मोटार चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ, त्याची कार्यपद्धती ही अतिशय वेगळी आहे. त्याचप्रमाणे ती योग्य प्रकारे अनुसरावी लागते. ती अनुसरण्यासाठी त्या प्रकारची मानसिकता नक्कीच हवी, त्या विजेच्या गाडीचा वापर कसा प्रभावीपणे करता येईल, हे पुरेसे नसेल, तर विद्युतभारित करण्यासाठी बॅटरी कोणती आहे, तिची शक्ती व तुमच्या मोटारीची शक्ती कोणत्या स्तरातील आहे, त्यानुसार असणारे इंधनदर्शक मीटर वाचता येणेही आवश्यक ठरणार आहे. युरोपातील वा आशियातील विकसित अशा देशांमध्ये चार्जिग स्टेशनचे रूप अद्ययावत असे झालेआहे. सार्वजनिक दूरध्वनी सेवाकेंद्राप्रमाणेही ही चार्जिग स्टेशन्स तयार झालेली आहेत. छोटय़ा हॅचबॅकपासून व्यावसायिक वाहनांपर्यंत विकसित झालेली ही विजेवर चालणारी वाहने या चार्जिग स्टेशनचा वापर करत आहेत. किंबहुना चार्जिग स्टेशन्सबरोबरच व त्यांचा वापर करणारे सुजाण वाहनचालक मालक हेच या यंत्रणेच्या यशाप्रत नेणारे घटक म्हणायला हवेत.    (क्रमश:)    
– रवींद्र बिवलकर
ravindrabiwalkar@gmail.com