बाइकचे वेड प्रत्येकालाच असते. लहानथोरापर्यंत प्रत्येक जण त्या त्या वयानुसार बाइककडे आकर्षिला जात असतो. या बाइकही जीवाला वेड लावतील अशा प्रकारच्या असतात. साधी बाइक, स्कूटर, स्पोर्ट्स बाइक, सुपर बाइक आणि काय काय नावं असतात त्यांना. यातील काहींची ओळख..
दुचाकीबद्दल आपल्याला नावीन्य नाही. आपल्यापकी प्रत्येकाने चालवली असेल. आपल्याला मोटरसायकल आणि स्कूटर (मोपेद) हे प्रकार माहीत आहेत. पण दुचाकी किती प्रकारांत येतात. त्यांच्या किमती कशा प्रकारे ठरतात याबद्दल कुतूहल असते. दुचाकी पुढील प्रकारात येतात – स्टँडर्ड, क्रूजर, स्पोर्ट्स, टूिरग, ऑफ रोड आणि डर्ट बाइक. वरील सर्व प्रकार आपण पाहू.
९ स्टँडर्ड : या १०० ते १५० सीसी इंजिन असलेल्या आणि सर्वसाधारण कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकी. या उत्तम मायलेज देतात व कमी किमतीत उपलब्ध असतात.

९ टूिरग : लांब पल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या. वजन सर्वात जास्त. (४००-५०० किलो) सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा. पाठीला आराम पडेल अशी बठक. बऱ्याच देशांत पोलीस वापरतात.

९ क्रूझर : या चालकाच्या बसण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. एकमेव दुचाकी, ज्यात पाय पुढे आणि चालक मागे टेकून बसतो. अमेरिकेत अशा प्रकारच्या गाडय़ांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हर्ली डेव्हिडसन हे त्याचे प्रमुख उदाहरण. भारतातही एचडीचे आकर्षण आहे. या गाडय़ांचे इंजिन सर्वसाधारणपणे २०० सीसीच्या पुढे असते.

९ स्पोर्ट्स : गतिमानता (अ‍ॅक्सिलरेशन), वेग आणि सर्वोत्तम इंजिन क्षमता ही या प्रकारातील गाडय़ांची वैशिष्टय़े. वळणावर वेग फारसा कमी न करता वळवता येते. दुचाकीच्या शर्यतीत वापर. वजनाने हलक्या. दुकाती, कावासकी, सुझुकी या कंपन्या अशा प्रकारच्या गाडय़ा बनवतात.

९ ऑफ रोड आणि डर्ट बाइक : खास डोंगराळ रस्त्यासाठी बनवलेल्या. चिखल आणि पावसाळ्यात वापरल्या जातात. चाक आणि गाडी यात सगळ्यात जास्त अंतर असते. वजनाने सर्वात हलक्या. यांच्या शर्यती डोळ्यांना पर्वणी असते. उंच उंच उडणाऱ्या गाडय़ा, चिखलाने बनवलेले अडथळे आणि चालकाचे कौशल्य यांची रेलचेल असते. केटीएम, यामाहा या कंपन्या प्रसिद्ध.

पार्ट्सबद्दल :
९ इंजिन : इंजिन हे साधारणत: स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियमचे बनवलेले असते. एक ते सहा सििलडर इंजिनमध्ये ताकद निर्माण करतात. वेगवेगळ्या ड्राइव्ह मोडनुसार इंजिन पॉवर तयार करते. २०० ते २५० सीसीपर्यंतच्या गाडय़ा एअरकूल्ड असतात. २५०सीसीवरच्या गाडय़ांमध्ये कूलेंट किंवा पाणी गाडीचे इंजिन थंड करण्यासाठी वापरले जाते. बहुतेक गाडय़ांमध्ये पिस्टन अ‍ॅल्युमिनियमचे असतात.
९ ब्रेक्स : या गाडय़ा वेगात पळत असल्यामुळे सुरक्षेचा विचार करून ब्रेक्स बनवलेले असतात. ब्रेक्स हे ड्रम किंवा डिस्क ब्रेक्स असतात. मागील ब्रेक्स हे एबीएस या तंत्राचा वापर करून बनवतात. ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा वापर करून एका सेकंदात १२ ते १६ वेळा ब्रेक लावते आणि सोडते. त्यामुळे गाडी घसरत नाही. गाडीचा वेग १०० ते ११० किमी ५ सेकंदांत आणता येतो. पुढील ब्रेक्स, ब्रेक पॅड्स आणि उत्तम धातूने बनवलेल्या डिस्कचे असतात.
९ सस्पेन्शन : पुढील सस्पेन्शन हे मुख्यत: दोन पाइपसारखे दिसते आणि मागील सस्पेन्शन अनेक धातूंच्या मिश्रणाने बनलेल्या एका िस्प्रगसारखे असते. ऑफ रोड आणि डर्ट बाइक या गाडय़ांमधील सस्पेन्शन हे खास संशोधनाने बनवले जातात. त्यातील धातू आणि तेल विशेष पद्धतीचे असतात.
९ गीयर बॉक्स : ४ ते ६ गीयर्स असतात. इथे डिझाइन आणि तंत्राचा वापर करून योग्य गतिवर्धन मिळेल आणि गाडी नियंत्रणात राहील याची खबरदारी घेतली जाते.
९ चाके : चाकांचा घेर आणि जाडी साधारणत: जास्त असते. त्यामुळे गाडी नियंत्रणात राहते.
९ इलेक्ट्रिक सिस्टीम्स : ही या सर्व गाडय़ांचा अविभाज्य घटक आहे. सेन्सर्स आणि गाडीचे नियंत्रण याचा योग्य ताळमेळ ही सिस्टीम बसवते. गाडी चालू करून ते गाडीच्या तापमानापर्यंत सर्व काही इलेक्ट्रिक सिस्टीमने नियंत्रित होतात.
किंमत
यापकी बहुतेक गाडय़ा भारतात उपलब्ध आहेत. किंमत दीड लाखापासून ते ५० लाखांपर्यंत आहे. किंमत ही नुसतीच ब्रँडने ठरत नसून डिझाइन, इंजिन क्षमता, पॉवर, ब्रेक्स, त्यामध्ये वापरल्या जाणारे महागडे पार्ट्स आणि सुरक्षितता याचा एकत्रित विचार करून ठरते. इंधन कार्यक्षमतेचा विचार या गाडय़ा निर्मिती करताना केला जात नाही. या गाडय़ा ६ ते १० किलोमीटर प्रतिलिटर चालतात.
हार्ली-डेविडसन  CVO  लिमिटेड – ५० लाख
हार्ली-डेविडसन स्ट्रीट ग्लाइड स्पेशल, दुकाटी दियवेळ स्पोर्ट्स – ३० लाख,
दुकाटी फॅट बॉय, होंडा शफ १२००ो – २० लाख