टाटा मोटर्सने अलिकडेच नवीन टाटा सफारी स्ट्रॉर्म ही लक्झरी, आरामदायीपणा व पुरेपूर शक्ती, बेजोड ऑफ-रोडिंग कामगिरी यांचा सुरेख संगम असलेली, ‘रियल एसयुव्ही’ बाजारपेठेत दाखल केली आहे.
ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा समजून घेऊन त्यानुसार आमच्या समृद्ध अनुभवाच्या पाठबळावर आम्ही आधुनिक मोटोरीस्टस्ना साजेशी आदर्श एसयुव्ही तयार केली आहे. विविध वैशिष्टय़े, सोयीसुविधा व आरामदायीपणा या सर्व गोष्टी आपल्या गाडीत असाव्यात अशी इच्छा असणाऱ्यांनी ही गाडी अगदी योग्य आहे, असे टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांनी सांगितले.
या गाडीची क्षमता अतिशय दमदार आहे. याचे २.२ एल व्हॅरीसीओआर इंजिनमध्ये व्हेरिएबल टर्बाईन तंत्रज्ञान वापरले असल्याने हिची शक्ती १४० पीएस व टॉर्क ३२० एनएम आहे. साहजिकच ही गाडी चालवणे खूपच सहज आहे, वेगवान कामगिरी असली तरी हिचा एनव्हीएच (आवाज, व्हायब्रेशन व अपाय पोहोचविण्याची संभाव्यता) खूपच कमी आहे. यामध्ये ईएसओएफ (इलेक्ट्रॉनिक शिफ्ट-ऑन-फ्लाय) तंत्रज्ञान असून त्यामुळे गाडी चालत असताना ४x४ किंवा ४x२ वापरला जाऊ शकतो. हे सर्व असूनही या गाडीची इंधन क्षमता ४x२ मध्ये प्रति लिटरमागे १४ किमी व ४x४ मध्ये प्रति लिटरमागे १३.२ किमी आहे.
सफारी स्टॉर्मची लॅडर फ्रेम चेसिस अत्याधुनिक हायड्रोफॉर्मड्पासून बनवण्यात आल्याने ही गाडी भरपूर वजन वाहू नेऊ शकते. हायड्रोफोमिंगमुळे गाडीची मजबुती आहेच, पण तिचे वजनही कमी केले आहे. या गाडीत डबल विशबोन सस्पेन्शन सेट-अप असल्याने तिच्यातील प्रवासाचा आरामदायीपणा वाढतो.
सफारी स्टॉर्ममध्ये अशा प्रकारच्या गाडय़ांच्या तुलनेत सवरेत्कृष्ट म्हणजे ५.४ मीटरच्या परिघात गोल फिरण्याची क्षमता असल्याने अगदी कमी जागेतही ही गाडी सहजगत्या चालवता येऊ शकते. हिचा ग्राऊंड क्लिअरन्स २०० एमएम आहे.
लुक्स व स्टाईल
संपूर्णत: नवीन फ्रंट लुक ग्रिल, साईड क्लॅडिंग, नवीन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स व पूर्णपणे नवीन रिअर लुक ही टाटा सफारी स्टॉर्मची खास वैशिष्टय़े आहेत. याच्या बॉनेटवर पॉवर बल्ज आहे. ज्यामुळे याला स्पोर्टियर लुक मिळतो. एरोडायनामिक पद्धतीने डिझाईन केलेले स्पायलर्स, नवीन पूल पद्धतीचे डोअर हॅन्डल्स व एर्गोनॉमिकली डिझाईन केलेले साईड फूट-स्टेप्स यामुळे गाडीचे चढणे व खाली उतरणे सोपे होते. एर्गोनॉमिकली डिझाईन केलेली ग्रॅब हॅन्डल्स व गाडीच्या खाली आणखी एक पर्यायी वापरासाठीचा टायर ठेवण्याची सोय ही सफारी स्टॉर्मची वैशिष्टय़े आहेत. नवीन कोम-टिप्ड् ट्विन एक्झॉस्टस्मुळे गाडीचा स्पोर्टिनेस वाढविण्यात आला आहे.
दिमाख व आरामदायीपणा
गाडीच्या आत लक्झरियस, हवेशीर, मोकळी जागा असल्याने सफारी स्टॉर्म दिमाखदार दिसते. बसल्यानंतर समोर पाय मोकळे सोडायला भरपूर जागा व डोक्याच्या वरदेखील बऱ्यापैकी जागा असल्याने संपूर्ण कुटुंबासमवेत आरामदायी प्रवास करता येऊ शकतो. शिवाय सामान ठेवायलाही भरपूर जागा आहे.
या गाडीला सर्व चारही चाकांना व्हॅक्यूम असिस्टेड स्वतंत्र हायड्रॉलिक, व्हेन्टीलेटेड डिस्क ब्रेक्स व ईबीडीसोबत ४ चॅनेल एबीएस आहे. यामुळे अचानक ब्रेक्स लावावे लागले तरी गाडीवर नियंत्रण ठेवणे सहजशक्य होते. याशिवाय इनर्शिया स्वीच व ऑटो इंजिन इम्मोबिलायझर यासारखी वैशिष्टय़ेदेखील यात आहेत. आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास इनर्शिया स्विच इंजिनला होणारा इंधन पुरवठा थांबवतो व सर्व दरवाजे अनलॉक करतो, धोक्याचा इशारा देणारा दिवा सुरू होतो. जेणेकरून आजुबाजूच्या इतर गाडय़ांनाही धोक्याचा इशारा मिळतो. सफारी स्टॉर्ममध्ये गाडी चालवताना समोरचे अधिक चांगले व सुस्पष्ट दिसण्यासाठी व अनावश्यक चकचकीतपणा टाळण्यासाठी पीईएस हेडलॅम्पस् लावण्यात आले आहेत.
ही गाडी चार प्रकारात उपलब्ध आहे- एलएक्स, ईएक्स, व्हीएक्स (४x२ व ४x४), अर्बन ब्राँझ,सार्डिनिया रेड, पर्ल व्हाईट, पर्ल श्ॉम्पेन, अ‍ॅस्टर्न ब्लॅक, आक्र्टिक व्हाईट व आक्र्टिक सिल्व्हर. या रंगामध्ये पर्याय ठेवण्यात आला आहे. किंमत- ९ लाख ९५ हजार रुपये (एक्स शोरूम, ठाणे.)