माझी कार प्रमाणापेक्षा जास्त व्हायब्रेट होते. उपाय सांगा.
– वरुण बोराडे, नंदुरबार
= कारचे इंजिन ऊर्जा निर्माण करते म्हणजेच ही प्रक्रिया होताना फायिरग होते. या फायिरगची रचना अशा पद्धतीची असते की, आवाज आणि कंपन कमीत कमी निर्माण व्हावे आणि ते चालक किंवा गाडीतील इतर प्रवाशांपर्यंत पोहोचू नये; पण काही कारणे अशी असू शकतात, की ज्यामुळे कंपने निर्माण होतात. जसे फायिरगची रचना सदोष असणे किंवा कारच्या मेकॅनिकल रचनेत असमतोल असणे इत्यादी. असे होत असेल तर इंजिनचे नटबोल्ट घट्ट करावे आणि इंजिन टायिमग सेट करावे.

इंजिनमध्ये ऑइल कुलर कशासाठी वापरतात?
– सचिन कोपरीकर, औरंगाबाद<br />= इंजिनमध्ये वापरले जाणारे लुब्रिकेटिंग ऑइल (वंगण) हे घर्षण कमी करण्याबरोबरच निर्माण होणारी उष्णताही कमी करते म्हणजेच वाहून नेते, पण जर हेच ऑइल अतिप्रमाणात उष्ण झाले तर मग त्याची स्निग्धता कमी होते. त्यामुळे इंजिनाचे तापमान वाढते. इंजिनासाठी हे धोकादायक असते. म्हणूनच ऑइलचे तापमान वेळीच कमी करण्यासाठी ऑइल कुलर वापरतात. यात हीट एक्स्चेंजर कार्यान्वित असतो ज्यातून उष्ण ऑइल पाठवले जाते आणि थंड ऑइल बाहेर येते आणि हे चक्र सतत चालू राहते.
मयुर भंडारी

या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा