१. क्लच बेरिंगमधून आवाज येतो.
– आनंद गुंड, वैराग, सोलापूर.
*  क्लच बेरिंग ही मिश्र धातूपासून बनते. हे धातू बेरिंगची कमीत कमी झीज व्हावी असे बनवले जातात. पण ज्याअर्थी बेरिंगमधून आवाज निर्माण होतो म्हणजेच लायनरची झीज झाली असावी आणि क्लच बेरिंग खराब होणे किंवा फोर्क लिवर खराब असणे हीसुद्धा कारणे असू शकतात. म्हणून गीअर टाकताना क्लच पूर्णपणे दाबलेल्या स्थितीत असावा. तसेच रीसिंग रेगुलर असावे.
२. कारचे इंजिन ऑइल जास्त प्रमाणात लीक होते. उपाय सांगा.
– आल्हाद निपाणकर
*  इंजिन ऑइल खर्च होण्याचे मुख्य कारण लिकेज (गळती) असू शकते. सम्प गेस्केट (स्टोरेज), ड्रेन प्लग इत्यादी भागांतून गळती होण्याची जास्त शक्यता असते. दुसरे कारण असे की ऑइलचे इंधानासोबत ज्वलन होणे. असे फक्त तेव्हाच होते, जेव्हा पिस्टन आणि पिस्टन रिंग यांची झीज झालेली असेल किंवा ऑइल प्रेशर जास्त असेल. यावर उपाय म्हणजे ऑइल लेव्हल चेक करून ती मेन्टेन ठेवणे. लिकेज जिथून होत असेल तिथे वेळीच उपाययोजना करून थांबवणे. ऑइल प्रेशर कमी करणे इत्यादी उपाय करू शकता.
मयुर भंडारी
या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.