RTOमोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेगुलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत. त्यापकी नियम १३, १४ व १५ खाली देण्यात आले आहेत .

१३) ब) जेव्हा थांबायचे असेल तेव्हा चालकाने त्याचा उजवा हात कोपरापर्यंत सरळ उभा करून वाहनाच्या उजव्या बाजूने बाहेर काढावा, तसेच तळहात सरळ उभा ठेवावा.

क) जेव्हा वाहन उजवीकडे वळवायचे असेल किंवा पुढे असलेल्या वाहनास ओवरटेक करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी उजवीकडे काढायचे असेल अशा वेळेस वाहन चालकाने त्याचा उजवा हात क्षितिजसमांतर ताणावा आणि वाहनाच्या उजव्या बाजूने बाहेर काढावा तसेच तळहाताचा तळवा समोरच्या बाजूने फिरवलेला असावा.

ड) जेव्हा वाहन डावीकडे वळवायचे असेल किंवा रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्यायचे असेल अशा वेळेस वाहनाच्या चालकाने त्याचा उजवा हात सरळ लांब करावा आणि घडय़ाळाच्या काटय़ांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा .

इ) जेव्हा एखाद्या वाहनचालकाला त्याच्या वाहनाच्या मागच्या वाहनाला त्याचे ताब्यातील वाहनास ओवरटेक करण्याची परवानगी द्यायची असेल तेव्हा त्याने त्याचा उजवा हात क्षितिजसमांतर वाहनाच्या उजव्या बाजूने बाहेर काढावा आणि अर्धवर्तुळाकार गतीमध्ये मागे पुढे करावा.

१४) दिशादर्शक दिवे : यू टर्न घेताना हाताने दाखवायच्या खुणा यांत्रिक अथवा विद्युत यंत्रणेने सोप्या केलेल्या असल्यास त्यांचा वापर करण्यात यावा.

१५) वाहन पार्क करणे : १) वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्यावर उभे करताना सदर वाहनाकडून रस्त्याच्या उपयोग करणाऱ्या इतर व्यक्तींना धोका, अडथळा किंवा गरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच जर रस्त्यावर पाìकगसंबंधात काही फलक किंवा खुणा आखणी केलेल्या असतील तर त्याप्रमाणे वाहन पार्क करावे.