RTOमोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील
रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत. त्यापकी नियम क्रमांक १५ खाली देण्यात येत आहे.

१५) वाहन पार्क करणे : (२) वाहनाच्या चालकाने खालील परिस्थितीमध्ये वाहन पार्क करू नये.

High Court, Expresses Anger, maharashtra Government, Delay, Taking Possession, New High Court Building, Site in Bandra,
जागा हस्तांतरणाला होणाऱ्या विलंबावरून उच्च न्यायालयाने केली राज्य सरकारची कानउघाडणी
High Court decision, Accused, Seek Bail, Next Day, Authorities, Refuse Prosecution, under MoCCA,
आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती
supreme court
पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय

जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त रस्ते एकमेकांना क्रॉस करतात, जेथे वळण आहे, जेथे डोंगराचा माथा आहे, जेथे पूल आहे अशा जागेवर वाहन पार्क करू नये.

फूटपाथवर वाहन पार्क करू नये.

ट्राफिक लाइटच्या जवळ, पादचारी मार्गावर वाहन पार्क करू नये.

मुख्य रस्त्यावर अथवा वेगवान वाहतुकीच्या रस्त्यावर वाहन पार्क करू नये.

दुसऱ्या पार्क केलेल्या वाहनाजवळ किंवा दुसऱ्या वाहनाला अडचण होईल, अशा प्रकारे वाहन पार्क करू नये.

रस्त्यावर आधीच पार्क केलेल्या वाहनाच्या समांतर प्रकारे वाहन पार्क करू नये.

जेथे रस्त्यावर सलग सफेद रंगाची रेषा आखलेली असेल तसेच सदर रेषेच्या सोबत एक आणखी रेषा जी सलग असेल किंवा तुटक असेल अशा ठिकाणी वाहन पार्क करू नये  .

बसवर, शाळा किंवा हॉस्पिटलचे प्रवेशद्वार या ठिकाणी किंवा साइन झाकले जात आहे अशा जागेवर, एखाद्या आस्थापनेत प्रवेश करण्याच्या जागेवर किंवा जेथे फायर हायद्रन्त आहे, अशा जागेवर वाहन पार्क करू नये.

रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन पार्क करू नये.

जेथे पाìकग करू नये असे ठरविण्यात आले आहे, तेथे वाहन पार्क करू नये.

फुटपाथच्या कडेपासून लांबवर वाहन पार्क करू नये.