रविवारी सी लिंक मार्गावर ऑडी कंपनीची आर ८ ही सुमारे दीड कोटी रुपये किंमत असणारी अलिशान मोटार अचानक आग लागून भस्मसात झाली. फार चर्चा झाली नाही मात्र हळहळले लोक. दीड कोटीच्या मालकीच्या देखण्या मोटारीची राख पाहावी लागली त्यांना तर धक्का बसलाच पण सुदैवाने प्राण वाचले. इतके होऊनही पुन्हा आठवण झाली ती आमच्या टाटा नॅनोची. छोटीशी नॅनो शोरूममधून बाहेर काढून घराच्या वाटेवर नेतानाच जळली म्हणे आणि बातमी पसरताच नॅनोपेक्षा दसपट आकाराची चर्चा सुरू झाली नॅनो अशीच आहे, तशीच आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नांना साकारणारी नॅनो जळली तो धक्का मात्र दीड कोटीच्या ऑडीपेक्षा जास्त दाहक होता. लोकांप्रमाणेच टाटा मोटर्सलाही अनेक शंकाकुशंकांना सामोरे जावे लागले.
टाटा सामोरे गेले पुन्हा मोटारीबाबत चिकित्साही झाली असेल, आणि नॅनोची कीर्ती दीडकोटी रुपयांच्या किंमतीपेक्षाही दिगंत झाली. कारण ती भारतीय बनावटीची व विदेशातही आता लोकप्रिय होऊ शकणारी छोटेखानी मोटार ठरली. तरीही टीकेला सामोरे जावेच लागले. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली अशा ठिकाणी नॅन जळाल्याची उदाहरणे आहेत. पण तरीही नॅनो पुन्हा उभी ठाकली ठामपणे. ऑडीच्या या जळण्याने मोटारशौकिनांना धक्का बसला. देखणी, सुंदर अशी ही मोटार जळून खाक झाली. ही कशामुळे आग लागली, त्यामागे नेमकी तांत्रिक कारणे काय होती, याचा शोध घेतला जाईल. त्यानुसार काही दोष आढळले तर त्याचे निकारकरणही होईल. अतिरिक्त काही जुळणी या मोटारीमध्ये केली असेल तर त्याबद्दल खुलासेही होतील. महागडय़ा अशा ऑडीचे जळणे दूरच्तिरवाहिनीवर बातम्यामध्ये पाहाताना मोटार शौकिनांना चटका लावणाहे होते. हे खरे. तरी हीएकूणच सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसलेल्या ऑडीपेक्षाही नॅनोचे जळणे मात्र सर्वसामान्यांना आवर्जून दाहक वाटले हे ही खरे. कारण ऑडीच्या या जळण्याच्या दुर्घटनेमुळे अनेकांना आठवण झाली ती नॅनो मोटार जळली होती, त्या घटनेची. सर्वसामान्यांना विशेष करून मध्यमवर्गाला परवडावी व मोटारसायकलवरून जाणाऱ्या जोडप्याला व त्यांच्याबरोबर बसविलेल्या त्यांच्या लहानग्याला पाहून ही परवडणारी छोटेखानी मोटार बनवावी असे उद्दिष्ट उराशी बाळगून रतन टाटा यांनी प्रेरणा घेतली व ती राबविली. त्यामुळेच ऑडीच्या या दुर्घटनेच्या निमित्ताने नॅनोच्या त्या जळण्याच्या घटनेची आठवण अनेकांना झाली. कारण नॅनो त्यांना आमची वाटली..!
प्रतिनिधी