मला नवीन कार घ्यायची आहे. माझ्याकडे सध्या वॅगन आर डय़ुओ (एलपीजी) ही गाडी असून माझा रोजचा प्रवास किमान ५० किमी असतो. माझ्या कुटुंबाचा आकार मोठा आहे. तरी मला तुम्ही कोणती गाडी सुचवाल.
 प्रीती पाडगावकर.
तुमच्या कुटुंबात किती माणसे आहेत यावर ते अवलंबून आहे. तुम्ही म्हणता तुमच्या कुटुंबात सहा माणसे आहेत तर तुमचे सर्व कुटुंबीय एकत्रितरीत्या बसू शकतील अशा चेव्ही एन्जॉय या गाडीला तुम्ही प्राधान्य द्यावे. फक्त चौघांसाठी हवी असेल तर पेट्रोलवर चालणारी स्विफ्ट डिझायर ही चांगली अ‍ॅव्हरेज देणारी गाडी आहे. रिट्झ पेट्रोल, टाटा मान्झा व टोयोटा इटिऑस हेही पर्याय आहेत. इंधनस्नेही गाडी तुम्हाला हवी असेल तर स्विफ्ट डिझायर व फोर्ड क्लासिक टीडीसीांय या सर्वोत्तम पर्याय आहेत.

मला दररोज ६५ किमीचा प्रवास हायवेवरून करावा लागतो. माझे बजेट पाच ते सात लाख रुपये आहे. मला कोणती गाडी घेणे परवडेल? – वैभव निंबाळकर
आर्थिकदृष्टय़ा परवडू शकणारी होंडा अमेझ ही डिझेलवर चालणारी गाडी उत्तम आहे. तिचा मायलेज २४ किमी प्रतिलिटर असून हायवेवर ती उत्तम मायलेज देते. फोर्ड क्लासिक टीडीसीांय हाही एक चांगला पर्याय आहे. तिची किंमत सात लाख २० हजार रुपये आहे. डिझायर डीडींयएस व्हीडींय हिचाही विचार करायला हरकत नाही. हायवेवर चालवण्यासाठी तुम्ही सेडान किंवा अर्टगिासारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा विचार करावा. अर्टगिा आठ लाखांपर्यंत मिळू शकेल. ह्य़ुंदाई ग्रँड आय१० सीांरडीांय हाही एक चांगला पर्याय आहे. परंतु तुम्हाला पेट्रोल कार हवी असेल तर स्विफ्ट डिझायर व्हीएक्सआय ही गाडी तुमच्यासाठी वरदान ठरू शकेल. एका लिटरला १८ किमी असा तिचा मायलेज असून डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत.