गेल्या दहा वर्षांपासून दुचाकी वाहन क्षेत्रात होंडाच्या युनिकॉर्नने तरुणांना भुरळ घातली आहे. नुकतेच कॉलेजात पाऊल टाकणाऱ्या तरुणाची पहिली पसंती असते ती युनिकॉर्नला. त्यामुळेच गेल्या दशकभरात युनिकॉर्नच्या खपाच्या आणि होंडा मोटारसायकलच्या यशाचा आलेख उंचावलेला ठरला. मात्र, काळाच्या ओघात युनिकॉर्नला टक्कर देऊ शकेल अशा गाडय़ा बाजारात आल्या आणि युनिकॉर्नची क्रेझ कमी होऊ लागली. परंतु आता या गाडीने पुन्हा एकदा झळाळी प्राप्त केली असून सर्वाना आकर्षून घेईल असे रूपडे धारण केले आहे. या नव्या अवताराचे नाव आहे सीबी युनिकॉर्न १६० सीसी.

डिझाइन आणि स्टाइल
dr12सीबी युनिकॉर्नची खरी ओळख म्हणजे तिचा आकार आहे. हेडलॅम्प दिमाखदार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला कानासारखे असणारे टìनग इंडिकेटर्स विराजमान झाले आहेत. पुढचे मडगार्ड मोठय़ा खुबीने तयार करण्यात आले आहे. त्याला डय़ुअल टोन शेड्सचा टच देण्यात आला आहे. हँडलबारमध्ये विशेष काही बदल नाहीत आणि त्यावरच स्विचगीअर देण्यात आले आहे. हँडलबारवरील सर्व साधनं म्हणजे ओडोमीटर, स्पीडोमीटर, आरपीएम, घडय़ाळ, टॅकोमीटर, डय़ुअल ट्रिप मीटर आणि इंधनाचे प्रमाण दाखवणारे इंडिकेटर हे सर्व डिजिटलाइज करण्यात आले आहे. फ्युएल टँक आधीच्या युनिकॉर्नच्या तुलनेत अधिक बाकदार करण्यात आले असून सीटच्या बाजूकडे ते निमुळते होत गेले आहे. त्याच्या पुढच्या बाजूला िवग्जसारखे दोन फ्लॅप लावण्यात आल्याने अधिकच उठावदार दिसते.

ब्रेकिंग पद्धत
dr13ब्रेकची पद्धत सीबी युनिकॉर्नमध्ये अगदी सोपी आहे. यात कम्बाइन्ड ब्रेकिंग पद्धत (सीबीए) अवलंबण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा फूटब्रेक पायडल दाबता तेव्हा पुढील डिस्क ब्रेक आपोआप सक्रिय होतो आणि त्याचवेळी मागचाही ब्रेक सक्रिय होऊन गाडी जागच्या जागी थांबते. त्यामुळे रस्त्यावरून वेगाने जात असताना कोणी अचानक आडवे आलेच तर गाडीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून ब्रेक लावता येतो.

इंजिन
आधीच्या तुलनेत नव्या सीबी युनिकॉर्नमध्ये इंजिनाची ताकद अर्थातच वाढवण्यात आली आहे. सिंगल सििलडर असलेले हे इंजिन १६३ सीसीचे असून त्यातून निर्माण होणारी कमाल ऊर्जा १४.७१ आहे, तर उच्चवेगाला सीबी युनिकॉर्नचा टॉर्क १४.६१ एनएम एवढा असतो. मात्र, या बाइकमध्ये फ्युएल इंजेक्शन सिस्टीम नाही. मोनो सस्पेन्शन असलेली युनिकॉर्न ६२ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. शिवाय इंजिन एअरकूल्ड आहे. फक्त लाल-नािरगी रंगाच्या युनिकॉर्नचे इंजिन काळ्या रंगाचे असल्याने ते थोडेस ऑड दिसते.

आसन व्यवस्था
गाडीचा आकार शेपटाकडे निमुळता होत जाणारा असला तरी चालकाच्या मागे बसणाऱ्याला बऱ्यापकी जागा उपलब्ध आहे. मागच्या सीटचा आकार थोडा उंच वाटत असला तरी बसणाऱ्याला आरामदायी वाटू शकेल आणि लांबच्या प्रवासात पाठदुखी जाणवणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. सीबी चालवणाऱ्यालाही सीटवर बसल्यानतंर आरामदायी वाटू शकेल.

किंमत
होंडा सीबी युनिकॉर्न एसटीडी आणि सीबीएस या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे ६९ हजार ३५० रुपये आणि ७४ हजार ४१४ रुपये आहे. या किमती एक्स-शोरूम आहेत.