Sameer-ookमला टूरसाठी चारचाकी गाडी घ्यायची आहे. माझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. मला कोणती गाडी घेणे परवडेल. फोर्ड ईको स्पोर्टबाबत आपले मत काय आहे. कृपया सांगा.
– प्रशांत बांगर,भायला, ता. पाटोदा

तुमचे बजेट १०-१२ लाख रुपये असेल तर रेनॉ डस्टर किंवा लॉजी यापकी एका गाडीची निवड करा. रेनॉच्या गाडय़ा दणकट आणि टिकाऊ आहेत.

माझ्या निवृत्तीनंतर मी पुण्यात स्थायिक झालो. माझ्याकडे जुनी फियाट पालिओ ही गाडी आहे. तिचे रजिस्ट्रेशन हैदराबादचे आहे. मी ही गाडी पुण्यात वापरू शकतो का. त्यासाठी मी कोणती कागदपत्रे जवळ बाळगू. मला काही कर वगरे भरावे लागतील का.
– जयंत कुलकर्णी

सेकंड हॅण्ड कारसाठी काही कर वगरे लागत नाहीत. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तसाच राहील मात्र तुम्हाला तुमच्या गाडीची पुणे आरटीओमध्ये नोंदणी करावी लागेल. तुम्हाला साधारणत: हजार-दीड हजार रुपये खर्च येईल.

मला डॅटसन गो प्लस या गाडीबद्दल माहिती हवी आहे. माझे बजेट आठ-नऊ लाख रुपये आहे. परंतु माझे आठवडय़ाचे ड्रायिव्हग १०० किमीचे आहे. आमच्या कुटुंबात आम्ही सात जण आहोत.
– डॉ. जयंत राजपुरे

डॅटस गो प्लस ही छोटी कार असून तिची किंमत चार-पाच लाखांत येईल. मात्र, तुम्हाला सेडान हवी असे तर फोर्ड अस्पायर ही गाडी चांगली आहे. तुम्हाला एमयूव्ही हवी असेल तर फोर्ड इकोस्पोर्ट ही चांगली गाडी आहे. तुम्हाला सात आसनी गाडी हवी असेल तर शेवरोले एन्जॉय ही योग्य गाडी आहे.

सर, माझे बजेट चार लाख रुपये आहे. कृपया मला माझ्या बजेटात कोणती गाडी घेता येईल, याचे मार्गदर्शन करा. माझा कारचा वापर फक्त सुटीच्या दिवशीच असेल, दररोजसाठी नसेल.
– महेश बोकारे

तुम्ही फक्त सुटीच्या दिवशीच कार चालवणार असाल तर डिझेलवर चालणारी कार अजिबात घेऊ नका. चांगला मायलेज देणारी आणि पेट्रोलवर चालणारी गाडी म्हणजे डॅटसन गो किंवा वॅगन आर. या दोन सर्वोत्तम गाडय़ा आहेत, की ज्या तुमच्या बजेटात आरामात येऊ शकतील.

मला सात आसनी गाडी घायची आहे. अर्टगिा सीएनजी व होंडा मोबिलिओ यापकी कोणती गाडी घेऊ. माझ्या पाìकग स्पेसमध्ये या दोनच गाडय़ा बसू शकतात. कृपया मार्गदर्शन करा.
– स्वप्निल देशमुख

अर्टगिा आणि मोबिलिओ या गाडय़ा सात आसनी आहेतच परंतु मागील सीटवर दोघे लहान मुलेच आरामात बसू शकतात. पण मोठय़ांना त्रासदायक ठरू शकते. मी तुम्हाला रेनॉ लॉजी ही गाडी सुचवीन. पण जर जागेचा प्रश्न असेल तर शेवरोले एन्जॉय घ्यावी.

सर, मला कार घ्यायची असून माझे बजेट ७ ते ११ लाख रुपये आहे. मला चांगली कम्फर्ट देणारी, मायलेज देणारी कार हवी आहे. तसेच मला उंच सीटची सुविधा असलेली एसयूव्ही घेण्याची खूप इच्छा आहे. माझ्या बजेटमध्ये हे सर्व असलेली गाडी मिळणे शक्य आहे का.
– चंद्रशेखर पांडे

मी तुम्हाला डिझेल व्हेरिएन्ट एसयूव्ही घेण्यास सुचवील. आठ लाखांपर्यंत अशी गाडी तुम्हाला मिळू शकेल. मारुती एस-क्रॉस ही एक चांगली गाडी असून तो तुम्हाला उत्तम पर्याय ठरेल. अन्यथा ुंदाई क्रेटा ही गाडीही चांगली आहे.
सर माझे बजेट पाच लाखांपर्यंत आहे. मला डिझेल कार कोणती चांगली असेल ते सांगा.
– साहेबराव पगारे

पाच लाखांत चांगली डिझेल कार म्हणजे सेलेरिओ एलडीआय. हिचा मायलेज २४ किमी प्रतिलिटर एवढा आहे. तसेच तिचे इंजिन डीडीआयएस आहे. त्यामुळे मेन्टेनन्सही फारसा नाही.

 

या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com
वर पाठवा.