या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.

’मला टाटा झेस्ट एक्सएमए ही गाडी खूप आवडली आहे. मला ही गाडी घ्यायची खूप इच्छा आहे. मात्र, तिच्या परफॉर्मन्सबाबत काही माहिती नाही. कृपया सांगा काय करू?
– विक्रमादित्य पुरावत
’टाटा झेस्ट ही सर्वोत्तम डिझेल अ‍ॅटोमॅटिक कार आहे. तिचा मायलेज, तिचे इंटेरियर सवरेत्कृष्ट आहे. डोळे मिटून गाडी घ्या. काही हरकत नाही.
’सर, माझे बजेट सहा ते साडेसहा लाख रुपये आहे. मला वीकेण्डसाठी वगैरे गाडी घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग अंदाजे ३०० किमी होईल. मी कमी मेन्टेनन्सवाली आणि चांगला मायलेज देणारी गाडी घेण्याचा विचार करतो आहे. कृपया कोणती गाडी चांगली ठरेल ते सांगा.
– संजय खेलते
’सध्या तरी कमी मेन्टेनन्स असणारी आणि जास्त मायलेज देणारी आणि रिसेल व्हॅल्यूही उत्तम असणारी एकमेव गाडी म्हणजे मारुती स्विफ्ट किंवा डिझायर. या दोन्ही गाडय़ांचे इंजिन अगदी स्मूद आहे. या दोन्ही गाडय़ा १९ किमी प्रतिलिटर एवढे मायलेज देतात.
’आम्ही कार घेण्याचा विचार करत असून आमचे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. वीकेण्डला जाणे किंवा महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे एवढाच मर्यादित स्वरूपात गाडीचा वापर असेल. व्ॉगन आर व्हीएक्सआय, सेलेरिओ व्हीएक्सआय आणि डॅटसन गो एनएक्सटी या तीन गाडय़ांपैकी कोणती घ्यावी? माहितीच्या महाजालात खूप शोधले, परंतु तीनही गाडय़ांचे रिव्ह्य़ू गोंधळात टाकणारे आहेत. काय करू?
– निगार शेख
’मी तुम्हाला फोर्ड फिगोचे नवीन मॉडेल घेण्याचा सल्ला देईन. ही एक उत्तम आरामदायी गाडी आहे. त्यात तुम्हाला एअरबॅग्जही मिळतील. शिवाय हिची ऑनरोड किंमतही पाच लाख रुपये आहे. मात्र, तरीही तुम्ही उंच गाडीच्या शोधात असाल तर मग व्ॉगन आर व्हीएक्सआय ही गाडी उत्तम आहे.
’खूप कमी मेन्टेनन्स असलेली गाडी मला घ्यायची आहे. मला इनोव्हा गाडी खूप आवडते आहे. मला या गाडीबद्दल माहिती द्या.
– अविनाश वसावे, नंदुरबार
’इनोव्हा ही गाडी खूप चांगली आहे. मात्र, तिचा आकार मोठा आहे. त्यामुळे तिच्या देखभालीचा खर्चही खूप मोठा आहे. तसेच या गाडीची किंमतही १५ लाखांपासून सुरू होते. मात्र, तुमचे बजेट १२-१५ लाख रुपये असेल आणि तुम्हाला पाच लोकांसाठी गाडी घ्यायची असेल तर मी तुम्हाला ह्य़ुंदाई क्रेटा ही गाडी घेण्याचा सल्ला देईन.
’मला नवीन कार घ्यायची आहे. मारुती सुझुकीची स्विफ्ट ही गाडी खूप आवडते. स्विफ्टव्यतिरिक्त अन्य कोणती चांगली गाडी आहे? दुसऱ्या ब्रँडच्या पण चालतील. कृपया मार्गदर्शन करा.
– श्रीकांत जोशी
’तुम्ही पेट्रोल व्हर्जनमधील गाडी बघत असाल तर स्विफ्ट आणि होंडा जॅझ या दोन्ही गाडय़ा सर्वोत्तम आहेत. होंडा जॅझमध्ये सुरक्षा उपाय खूप आहेत. मात्र, त्यासाठी स्विफ्टमध्ये तुम्हाला झेडएक्सआय हे मॉडेल घ्यावे लागेल व तिची किंमत साडेसात लाख रुपये आहे. त्यामुळे तुम्ही होंडा जॅझ या गाडीला प्राधान्य द्यावे.
’मला प्रथमच कार घ्यायची आहे. माझे बजेट तीन ते चार लाख रुपये आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग अंदाजे १००-२०० किमी असेल. मला चांगला मायलेज देणारी आणि कमी मेन्टेनन्स असणारी गाडी हवी आहे. क्विड कितपत चांगली आहे? तुम्ही काय सांगाल?
– संतोष बजाज
’क्विड अल्टोपेक्षा दिसते चांगली, परंतु ती नवीन असल्याने तिच्या परफॉर्मन्सबाबत आताच काही सांगू शकत नाही. मी तुम्हाला नव्या नॅनोची टेस्ट ड्राइव्ह करण्याचा सल्ला देईन किंवा मग अल्टो८०० व्हीएक्सआय (एअरबॅग्जसह) ही गाडी घ्या.
’ुंदाई क्रेटा आणि मारुती एक्स-क्रॉस यापैकी कोणती गाडी चांगली आहे?
– प्रशांत आघाव
’ह्य़ुंदाई क्रेटाला ग्राऊंड क्लिअरन्स जास्त आहे. फीचर्सच्या दृष्टीने दोन्ही गाडय़ा सारख्याच आहेत. मात्र, तुम्हाला फोर व्हील ड्राइव्ह गाडी हवी असेल, तर ही सुविधा फक्त डस्टर आणि एस क्रॉस यांमध्येच आहे.
’मला महिन्यातून सात वेळा दररोज २५० ते ३०० किमीचा प्रवास करावा लागतो. मी मारुती ओम्नी वापरतो. मात्र, मला गाडी बदलायची असून स्विफ्ट किंवा टोयोटा लिवा डिझेल यापैकी एकाची निवड करायची आहे. कोणती गाडी घेऊ? तुम्हीच सांगा.
– विनीत साळुंखे, सातारा<br />’तुमचे इतके रनिंग पाहता तुमच्यासाठी डिझेल कार योग्य ठरेल. तुम्हाला मी टाटा झेस्ट ही गाडी घेण्याचा सल्ला देईन, कारण हिचे डिझेल इंजिन ९० एचपीचे असून गाडी खूपच आरामदायी आहे. शिवाय हिची किंमतही कमी आहे. त्यात तुम्हाला ऑटो ट्रान्समिशनचाही पर्याय उपलब्ध आहे.