* मला येत्या दोन-तीन महिन्यांत सेडान प्रकारातली गाडी घ्यायची आहे. कोणती कार मायलेजसाठी उत्तम ठरेल तसेच ग्रामीण भागातही चांगली चालू शकेल. मारुती सुझुकीची सिआझ (डिझेल व्हेरिएंट) घेण्याचा माझा मानस dr03   आहे. मात्र, त्याच वेळी स्विफ्ट डिझायर व ह्य़ुंडाई व्हेरना याही गाडय़ा मला भावतात. कृपया मला मार्गदर्शन करा.
– कुणाल राऊत, यवतमाळ
* मारुती सिआझ ही सेडान प्रकारातली आजची सर्वात उत्तम कार आहे. शिवाय तिचा मायलेजही चांगला आहे. होंडा सिटी आणि स्विफ्ट डिझायर यांच्यापेक्षा dr06ही गाडी स्पेशिअस आहे. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्सही चांगला असल्याने खराब रस्त्यांवरही ही चांगली चालू शकते. मात्र, ती घेण्यापूर्वी तिच्या इंजिनाच्या शक्तीबद्दल एकदा माहिती करून घ्या. अर्टगिाला असलेल्या इंजिनासारखेच ते आहे. गाडीच्या झेडएक्सआय मॉडेलचे टायर्स १६ इंची अलॉय व्हील्सचे आहेत. गाडीची इतर गुणवैशिष्टय़ेही चांगली आहेत. रिअर कॅमेराही आहे.
* माझे बजेट सात लाख रुपयांचे आहे. आम्ही दोघेही पती-पत्नी सरकारी नोकरीत आहोत. पत्नीला होंडा अमेझ (पेट्रोल व्हर्जन) कार आवडते. आमचे फार काही फिरणे नसते. त्यामुळे अमेझ घेणे परवडेल का, किंवा इतर कोणती कार घेणे जास्त संयुक्तिक ठरेल, याविषयी सांगा.
– श्रीकांत तेलंग, नागपूर
dr04* होंडा अमेझ ही चांगली कार आहे. तिचे आयव्हीटेक इंजिन चांगला मायलेज देते. किमान १६ किमी प्रतिलिटर असा या गाडीचा मायलेज आहे, यात शंकाच नाही. होंडा गाडय़ांची इंजिने विश्वासार्ह आणि मेन्टेनन्समुक्त असतात. तुम्हाला जर या गाडीविषयी खात्री वाटत असेल तर ती घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला स्पोर्टी लुक असलेली गाडी हवी असेल तर आय20 एलिट ही गाडीही चांगली आहे.
* आम्हाला हॅचबॅक प्रकारातली गाडी घ्यायची आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे सीएसआरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा उपाययोजना आहेत का, जसे की एअरबॅग्ज, एबीएस, ईबीएस वगरे. तसेच ऑटोमॅटिक फ्यूएल ट्रान्समिशन आहे का. टोयोटा लिवाह आणि फोक्सवॅगनची नवीन पोलो यापकी कोणता पर्याय निवडावा. लिवा फारशी रस्त्यावर दिसत नाही. लोक या गाडीचा विचार का करत नाहीत.
– सचिन वाणी, ठाणे
dr05* टोयोटा लिवा ही खरंच खूप चांगली कार आहे. तिचा बूट स्पेसही चांगला आहे. तुम्हाला जर सर्व सुविधा असलेली ऑटोमॅटिक कार घ्यायची असेल तर रिट्झ, ग्रँड आय10, सेलेरिओ या गाडय़ांचा विचार करा. तसेच टोयोटा लिवा आणि फोक्सवॅगन पोलो यापकी एकाची निवड करायची झाल्यास मी पोलोला प्राधान्य देईन.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com  वर पाठवा.