* नमस्कार सर, आपण लिहीत असलेल्या सदराचा नियमित वाचक असून व्यवसायाने शिक्षक आहे. आपले सदर वाचून मी सध्या ड्रायिव्हग शिकत आहे आणि कार घेण्याचा विचार आहे. माझे फिरणे जास्त नाही, कारण नोकरीचे ठिकाण घराजवळच आहे. माझे बजेट पाच लाखांपर्यंत आहे. एखादी चांगली कार सुचवा तसेच डिझेल कार किंवा पेट्रोल कार घेऊ? कृपया मार्गदर्शन करा.
– दीपक महाजन
* तुमचे गाडी चालवणे कमी असल्यामुळे पेट्रोल गाडी घेणे उत्तम ठरेल. पाच लाखांपर्यंत चालवायला सोपी अशी कार म्हणजे वॅगनआर. ती जर तुम्हाला लहान वाट असेल तर ग्रँड आय१०चाही विचार करायला हरकत नाही.
 ’सर माझे बजेट चार ते सहा लाख रुपये आहे व माझा गाडीचा वापर दोन ते अडीच हजार किमी दरमहा एवढा आहे तर मी कोणती गाडी घेऊ पेट्रोल की डिझेल, हे सांगा.
– युवराज भोसले
 * तुमचा गाडीचा वापर जास्त आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच डिझेल कारच घ्यावी. अद्याप सर्वात स्वस्त आणि चांगली डिझेल कार म्हणजे ुंदाई ग्रँड आय१० सीआरडीआय ही आहे. ती उत्तम मायलेजदेखील देते. रित्झ, टोयोटा लिवा याही चांगल्या गाडय़ा आहेत. लिवाचे डिझेल इंजिन ताकदवान आहे आणि या दोन्ही गाडय़ांचे मायलेजही २२ किमी प्रतिलिटर एवढे आहे. पण जर तुम्हाला पेट्रोल कार हवी असेल तर सर्वात मायलेज देणाऱ्या गाडय़ा होंडा ब्रियो आणि डिझायर या आहेत.
* मला गाडी खरेदी करायची आहे. माझे बजेट अडीच ते तीन लाख रुपये इतके आहे. मला एसी, फ्रण्ट पॉवर िवडो, पॉवर स्टीअिरग, ऑडिओ सिस्टीम व चांगला मायलेज ही वैशिष्टय़े असलेली गाडी हवी आहे. माझ्या बजेटमध्ये सेकंड हॅण्ड गाडी किंवा नवीन टाटा नॅनो याच बसू शकतात हे मला माहीत आहे. नॅनोबाबत मी द्विधा मन:स्थितीत आहे. नवीन कार घ्यावी की जुनी घ्यावी.
– मंगेश चितळे
* नवीन कारची बातच कुछ और असते. नवीन गाडी नॅनो जरी असली तरी ती जास्त मेन्टेनन्स काढत नाही. तुम्हाला मन:शांती मिळते. जुनी गाडी घेताना खूप चाचण्या कराव्या लागतात. त्यातून ती ओळखीतील असेल तर ठीक नाही तर ती कशी व कोणी वापरली असेल हे आपल्याला ठाऊक नसते. तुमच्या बजेटमध्ये मारुती वॅगन आर, होंडा जॅझ, स्विफ्ट या गाडय़ा येऊ शकतात. त्या जुन्या असल्या तरी जास्त मेन्टेनन्स काढत नाहीत. २०११-२०१२चे मॉडेल तुम्ही घ्यावे.
* मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट सहा लाखांपर्यंत आहे. माझा रोजचा प्रवास ३० किमीचा आहे. वीकेंडला जास्त ड्राइव्ह करत नाही. मला डय़ुअल एअरबॅग्ज असलेली गाडी हवी आहे. कोणती कार घेऊ, अमेझ, एक्सेंट की पोलो.
– मोहन शानभाग
* तुम्हाला डय़ुअल एअरबॅग्ज हव्या असतील तर बजेट सहा लाखांपेक्षा जास्त जाईल. परंतु तुम्ही ग्रँड आय१० घेतली तर ती डय़ुअल एअरबॅग्जमध्ये येऊ शकते. सहा लाखांच्या रेंजमध्ये फोर्ड फिगो व मारुती रित्झ याही गाडय़ा आहेत. टॉप एण्ड मॉडेलवर तुम्हाला डिस्काऊंटही मिळू शकेल.
* स्विफ्ट डिझायर, टोयोटा इटिऑस, ुंदाई आय१० आणि मारुती सुझुकी सिआझ यांपकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे. कारणही सांगा.
– डॉ. अरिवद यादव
* मारुती सिआझ हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र तिची किंमत इटिऑस, डिझायर किंवा आय२० यांच्यापेक्षा जास्त आहे. तुम्हाला उत्तम दर्जाची गाडी हवी असेल तर तुम्ही सिआझच घ्या. मात्र, तुमचे रोजचे शहरातील ड्रायिव्हग जास्त असेल तर तुम्ही डिझायर किंवा आय२० ला प्राधान्य द्या. या दोन्ही गाडय़ा कॉम्पॅक्ट आहेत आणि चार मीटर लांबीच्या असल्याने सहज चालवता येण्याजोग्या आहेत. तुमचा रोजचा प्रवास ३५ किमीपेक्षा जास्त असेल आणि तोही महामार्गावर असेल तर तुम्ही नक्कीच सिआझलाच प्राधान्य द्या.
* सर, मला मारुती सिआझ व टोयोटाची इटिऑस यांच्यापकी कोणती गाडी घेणे चांगले राहील. मी डॉक्टर आहे फार तर वीकेंडला माझा गाडीचा वापर असतो. पेट्रोल आणि डिझेल यापकी कोणता पर्याय चांगला ठरेल हेही सांगा.
– डॉ. दीपक दौंड
* तुम्ही पेट्रोल गाडी घ्यावी. मारुती सिआझ ही उत्तम पेट्रोल कार आहे आणि वजनाने हलकी असल्याने एॅव्हरेज खूपच जास्त आहे. १९ किमी प्रतिलिटर एवढा हिचा अ‍ॅव्हरेज असून अजूनपर्यंत या क्लासमध्ये ही सरस ठरते आहे. पण जर तुमचे रिनग कमी असेल तर स्कोडा रॅपिडची निवड करा. ही गाडी सिआझपेक्षा १५० किलोग्रॅमने जास्त असून याता आरामदायी आणि दणकट वाटते. तसेच रस्त्याला धरून चालते. इटिऑस ही या दोन्ही गाडय़ांपेक्षा स्वस्त आहे पण डिझेल गाडी घेणार असेल तरच ती उत्तम आहे.