
राजेशाही थाटमाटाच्या अलिशान मोटारीचे आकर्षण सर्वानाच असते, त्याविषयी अप्रूप वाटत असते. अर्थात ही मोटार एका विशिष्ट वर्गातील ग्राहकाला परवडणारी असते. ती देखील त्या वर्गातील ग्राहकाची तशी आवड असली की अशी शाही मोटार घेण्यासाठी तो ग्राहक मागेपुढे पाहात नाही.










