मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यांपकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.

३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे. कलम ११२, ११३, १२१, १२२, १२५, १३२, १३४, १८५, १८६, १९४, २०७.

सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत.

४) कलम १२२ : मोटार वाहन धोकादायक स्थितीत सोडून जाणे : मोटार वाहन ताब्यात असलेल्या व्यक्तीने सदर मोटार वाहन अथवा ट्रेलर इतर रस्ता वापर करणाऱ्यांना किंवा प्रवास करणाऱ्यांना धोका होईल किंवा धोका होऊ शकेल, अडथळा होईल किंवा अडथळा होऊ शकेल, गरसोय होईल किंवा गरसोय होण्याची शक्यता असेल अशा प्रकारे  सार्वजनिक जागेमध्ये उभे करू नये किंवा सोडून देऊ नये.

५) कलम १२५ : मोटार वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने त्याच्या वाहनाच्या नियंत्रण करण्याला बाधा येईल अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला उभे राहू देऊ नये अथवा बसू देऊ नये. आणखी असे की, अशा प्रकारे वाहन नियंत्रण करण्यास बाधा येईल अशी कोणतीही वस्तू ठेवण्यास मनाई करावी. पर्यावरण कर : खासगी वाहनाची नोंदणी केल्याच्या दिनांकापासून पंधरा वर्षांनी पर्यावरण कर लागू होतो. क्रमश:

-संजय डोळे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे</strong>