*मला गाडी घ्यायची आहे. मला कृपया मारुती बालेनो आणि फिगो अस्पायर या गाडय़ांविषयी तुमचे मत सांगा. माझे मासिक ड्रायिव्हग साधारण ६०० किमी आहे. मुंबई व परिसरातच माझे जास्त फिरणे होते. सध्या माझ्याकडे सेकंड हँड सँट्रो झिंग आहे.
आशीष शिंदे
*तुमचा गाडीवापर निव्वळ शहरापुरताच मर्यादित असेल, तर तुम्ही बिनधास्तपणे मारुती बालेनो घ्या, कारण ही वजनाने हलकी आहे आणि ट्रॅफिकमध्येही हिचा वेग आणि मायलेज उत्तम राहू शकतो. फिगो अस्पायर ही महामार्गावरील वापरासाठी आहे आणि जर तुम्हाला ऑटोगीअर गाडी हवी असेल, तर मग तुम्ही नवीन वॅगन आर एएमटी ही गाडी घ्यावी.
* माझे मासिक रिनग दीड ते दोन हजार किमीचे आहे. मला सिआझ ही कार आवडली आहे. मी सिआझचे पेट्रोलचे टॉप मॉडेल घेऊ की डिझेलचे? कारण माझे जास्तीत जास्त ड्रायिव्हग शहरात जास्त आहे. त्यातही साधारणत: ५०० किमीचे ड्रायिव्हग हायवेला आहे, तर मी कोणती गाडी घेऊ जी पिकप चांगली देईल आणि १६०/१७० तशी वेगाने व्हॉयबल न होता आरामात चालेल आणि सर्वाना आवडेल आणि जी बसायला आरामदायी असेल?
 रौनक लोढा
* ड्रायिव्हग फक्त शहरापुरताच मर्यादित असेल, तर पेट्रोल कार खूप महाग पडेल. तुम्ही डिझेल गाडी घ्यावी. पिकअप थोडा कमी असेल, परंतु स्पीड खूप असेल आणि गाडी व्हायब्रेट होत नाही. तुम्ही एसएचव्हीएस डिझेल सिआझ हे मॉडेल घ्यावे.
*मला नवीन कार घ्यायची आहे. माझे बजेट आठ लाख रुपये आहे. माझ्या कुटुंबात पाच जण असून तब्येतीने चांगले आहेत. या सर्वाना सामावून घेणारी कोणती योग्य गाडी आहे? तसेच माझे ड्रायिव्हग साधारण दोन हजार किमीचे असेल.
– सुहास जिरंगे

*तुम्हाला सेडान कार घ्यायची असेल, तर तुम्ही निसान सनी ही गाडी घ्या. ही एक सर्वोत्तम कार आहे. मात्र, तरीही तुम्हाला आणखी कमी बजेटमधील कार हवी असेल, तर टोयोटा इटिऑस ही एक चांगली कार आहे. ही पाच जणांसाठी असून आरामदायी आहे. तसेच तुम्ही टाटा झेस्टचाही विचार करू शकता.
*मला डॅटसन गो प्लस ही गाडी घ्यायची आहे. कृपया मला सांगा की, मी ही गाडी घेणे योग्य ठरेल का? किंवा मग मला योग्य पर्याय सुचवा.
– सचिन शास्त्री, लातूर</strong>

*तुमचे मासिक ड्रायिव्हग ९०० किमी असेल तर तुम्ही नवीन मारुती बालेनो ही गाडी घ्यावी. ही कार वजनाने हलकी आणि मायलेजला चांगली आहे. गो प्लसमध्येही जास्त जागा आहे.
*मला पेट्रोल कार घ्यायची आहे. स्विफ्ट डिझायर आणि होंडा अमेझ यांपकी कोणती गाडी सर्वोत्तम आहे? स्विफ्ट डिझायरमध्ये के सीरिज इंजिन आहे. ते चांगले असल्याचे समजते. कृपया मार्गदर्शन करा.
– राहुल कोंडेकर ,नागपूर

*मी तुम्हाला स्विफ्ट डिझायर घ्यावी, असा सल्ला देईन. दोन्ही गाडय़ांत उत्तम इंजिन आहे, परंतु स्पेस आणि डय़ुरॅबिलिटीचा विचार केला, तर डिझायर ही योग्य गाडी आहे. तुम्ही एकदा बालेनो पाहून मगच निर्णय घ्या.
*मला वॅगन आरच्या हाय एन्ड सीएनजीमध्ये जास्त रुची आहे. मला स्वत:ला वॅगन आरचा लूक सेलेरिओपेक्षा साधा वाटतो. सेलेरिओ गाडी घ्यावी असे वाटते, पण सल्ला देणारे सगळेच वॅगन आर घे, असे सांगतात. त्यात मारुतीचे सेल्समनपण याच गाडीचा जास्त आग्रह धरतात. सेलेरिओला प्लास्टिक/फायबरची इंधन टाकी आहे हे खरे आहे काय? असेल तर त्याचा काय फरक पडतो? सेलेरिओ उत्तम कशात आहे? कोणती गाडी घेऊ? आणि का?
– मदन साळवे

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे वॅगन आर, सेलेरिओ, अल्टो के१० या तीनही गाडय़ांमध्ये तेच इंजिन आहे. गीअरबॉक्सही तोच आहे. त्यामुळे या गाडय़ांमध्ये फक्त बाहय़रूप आणि आकाराचा फरक आहे. त्यामुळे तुम्हाला दिसायला, कम्फर्टला जी पटेल ती गाडी घ्यावी. वॅगन आरचे उत्पादन जास्त असल्याने सेल्समन ती घेण्यास प्रवृत्त करतात.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com