यामाहा मोटारसायकल म्हणजे वेग असे एक भारतीय तरुणांच्या मानसिकतेमध्ये बसलेला ठाम समज. जो पुन्हा एकदा यामाहाने तरुणांच्या अपेक्षांना सार्थ करण्याचा प्रयत्न केला आहे.
यामाहाची आर १५ ही मोटारसायकल लोकप्रिय झाली, त्यानंतर आता पुन्हा हीच मोटारसायकल नव्या रंगात यामाहाने अलीकडेच सादर केली आहे. आर १५ ची ही दुसरी आवृत्ती अलीकडेच भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आली असून एकूण चार आकर्षक रंगात या मोटारसायकली यामाहाने सादर केल्या आहेत.
१६.८ बीएचपी (१७ पीएस) व ८५०० आरपीएम इतकी कमाल ताकद असणारे व १५ एनएम व ७५०० आरपीएम इतका टॉर्क असणारे यामाहा आर १५ चे इंजिन १४९ सीसी क्षमतेचे आहे. एकूण सहा गीयर्स या मोटारसायकलीला असून १९७० एमएम लांबी, ६७० एमएम रूंदी व १०७० एमएम उंची असणारी ही मोटारसायकल प्रति सिलींडर ४ व्हॉल्व्ह असणारी आहे. लिक्विड कूलींग असणारी ही देखणी व आकर्षक मोटारसायकल द न्यू थंडरींग ग्रीन अशा विशेष आवृत्तीने सादर केली आहे.
 विशेष आवृत्ती असणाऱ्या द न्यू थंडरींग ग्रीन या आर १५ मोटारसायकलीची किमत १ लाख १२ हजार ७५० रुपये, तर मोटोजीपी रेसिंग ब्ल्यूची  किमत १ लाख १३ हजार ७५० रुपये, तर रेअरींग रेड असणाऱ्या सर्वसाधारण रंगातील तसेच इनव्हिसिबल ब्लॅक असणाऱ्या आर १५ मोटारसायकल किमत १ लाख १० हजार ७५० रुपये. आहे.
एक्स शोरूम दिल्लीसाठी या किमती असून अन्यत्र त्या थोडय़ा जास्त असतील. तसेच ऑन रोडसाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल.