दरवर्षी रस्ता अपघातांत हजारो लोकांना प्राण गमवावे लागतात. अनेकदा त्यात त्यांची काहीही चूक नसतानाही हकनाक जीव गमवावा लागतो. प्रत्येक अपघातानंतर सुरक्षित ड्रायिव्हग कशी होईल, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कसे कमी करता येईल, अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे वगरे अनेक विषयांवर चर्चा होते. चार-आठ दिवस ही चर्चा चालते .  या सर्व पाश्र्वभूमीवर निस्सान मोटर्सने सुरू केलेले ‘निस्सान सेफ्टी ड्रायिव्हग अभियान’ उल्लेखनीय ठरते. वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन निस्सानने वाहनचालक व मालकांसाठी देशभरात हे अभियान सुरू केले आहे. मुंबईतील मालाड येथील इनऑर्बटि मॉलमध्ये १६ आणि १७ फेब्रुवारीला हे अभियान नुकतेच पार पडले. या अभियानाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अपघात होण्याची कारणे व ती टाळण्यासाठी निस्सानने त्यांच्या गाडय़ांमध्ये केलेले उपाय यांचे प्रात्यक्षिक यावेळा दाखवण्यात आले. २ आणि ३ फेब्रुवारीला राजधानी दिल्लीतही ही प्रात्यक्षिके दाखवण्यात आली तर चेन्नईत २ व ३ मार्चला हे अभियान होणार आहे. गाडीचा वेग नियंत्रित कसा ठेवावा, वेग अति असेल तर गाडीतील सिस्टीमच कशी त्याची सूचना चालकाला देते, तसेच अपघातजन्य परिस्थिती निर्माण होताच गाडीतील सिस्टीम कशा कार्यरत होतात याची ही प्रात्यक्षिके होती. तसेच गाडी ३६० अंशाच्या कोनातून फिरवून सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेतही तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता याचे रोमांचकारी प्रात्यक्षिकही यावेळी दाखवण्यात आले. प्रात्यक्षिकांसाठी सिम्युलेटर्सचा वापर करण्यात आला होता. अभियानाला निस्सान मोटर्स इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ताकायुकी इशिदा व निस्सानच्या भारतातील विक्री व विपणनाची जबाबदारी असलेल्या हॉवर ऑटोमोटिव्ह प्रा. लि. चे विक्री व विपणन संचालक नितीश टिपणीस आदी अधिकारीवर्ग उपस्थित होता.