31 May 2016

आता लक्ष्य .. इलेक्ट्रिक कार

अनेक देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या मोटारी आज दिसून येत आहेत. विविध कंपन्यांनी आपापली वाहने त्यासाठी

January 31, 2013 12:51 PM

अनेक देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या मोटारी आज दिसून येत आहेत. विविध कंपन्यांनी आपापली वाहने त्यासाठी सज्जही केली आहेत. त्यांची संख्या सध्याच्या एकंदर वाहनांच्या तुलनेत खूप कमी असली तरी शेकडय़ांमध्ये नव्हे तर हजाराच्या संख्येत ती दिसत आहेत. त्यासाठी गरज असते तदी बॅटरी चार्ज करणाऱ्या केंद्रांची..

डिझेल व पेट्रोलसारख्या इंधनाच्या वाढत्या किमती व भविष्याच्यादृष्टीने त्याच्या उपलब्धतेमध्ये होणारी घट हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय नक्कीच आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील विविध देशांमध्ये इंधन बचत व पर्यावरणरक्षण ही गरज बनत चालली आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारी हा त्यासाठी एक उपाय आहे, तो अधिकाधिक विकसित करण्याचे कामही चालू आहे.
मोटारीमध्ये विजेच्या ऊर्जेद्वारे त्यामध्ये बसविण्यात आलेली मोटर काम करते व त्याद्वारे मोटारीला गती प्राप्त होते. ही वीज बॅटरीद्वारे साठविली जाते व त्यातील ऊर्जा ही मोटारीला पुरविली जाते. इनव्हर्टरसारखे साधन जसे काम करते तशा प्रकारे विजेवर बॅटरी चार्ज करण्यात येते व मोटारीतील ही बॅटरी जी नेहमीच्या बॅटरीपेक्षा काहीशी वेगळी व अधिक शक्तिशाली असते ती चार्ज होते. बॅटरीमध्ये चार्ज झालेली ही वीज वा साठविलेली वीज मोटारीमधील मोटरीला गती देण्याचे काम करते. त्या मोटरीतून मिळणारी गती कशा प्रकारे नियंत्रित करायची, त्यातील अधिक ताकद केव्हा व कशी प्राप्त करायची हे तांत्रिक काम पुन्हा वेगवेगळ्या वाहनांच्या कंपरन्यांनी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे विकसित केले आहे.
पेट्रोल वा डिझेलचे इंजिन मोटारीला गती देण्यासाठी जी ऊर्जा प्राप्त करतात ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी इंधनाचे अंतर्गत ज्वलन केले जाते त्याद्वारे इंजिन मोटारीला ऊर्जा प्राप्त करून देते. विजेबाबत तसे अंतर्गत ज्वलन हा प्रश्न नसतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने  अतिशय संरक्षक प्रक्रिया यामुळे होऊ शकते. वीजनिर्मिती हा आज कळीचा विषय बनला आहे. केव़ळ मोटारीच नव्हेत तर घरे, शेती, उद्योग यांना विजेची असणारी नितांत गरज पाहाता भारतासारख्या देशांमध्ये वीज उत्पादन हे देखील अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. विजेची वाढती गरज ही सध्या देखील अनेक ठिकाणी पूर्ण करणे शक्य झालेले नाही. अर्थात तरीही वीजनिर्मिती हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे.
युरोपात अनेक देशांमध्ये विजेवर चालणाऱ्या मोटारी आज दिसून येत आहेत. विविध कंपन्यांनी आपापली वाहने त्यासाठी सज्जही केली आहेत. त्यांची संख्या सध्याच्या एकंदर वाहनांच्या तुलनेत खूप कमी असली तरी शेकडय़ांमध्ये नव्हे तर हजाराच्या संख्येत ती दिसत आहेत. त्यासाठी गरज असते तदी बॅटरी चार्ज करणाऱ्या केंद्रांची. ती गरजही पूर्ण करण्यासाठी तशी केंद्रे त्या देशांमध्ये सुरू झाली आहेत.
सर्वसाधारणपणे गती किती मिळू शकेल, त्यासाठी किती किलोव्ॉट ताकदीची मोटर असायला हवी आदी अनेक तांत्रिक मुद्दे निगडीत आहेत. मुळात वीजेवर मोटार चालते ही सध्या अतिशय महत्त्वाची बाब आहे. भारतासारख्या विकसनशील देशामधील ती मोठी उपयुक्तता ठरणार आहे. यासाठीच सरकारने काही योजनाही दूरगामी दृष्टीने आखली आहे.  छोटेखानी स्कूटरीपासून ते अगदी व्हॅनसारख्या मोटाठय़ा वाहनांपर्यंत विजेवर चालणारी वाहने उपयुक्त व सक्षण ठरू शकतात हे युरोपातील देशामध्ये सिद्ध झाले आहे. किंबहुना वाहन उद्योगामध्ये विजेवरील मोटारी किंवा अन्य हायब्रीड पद्धतीच्या गाडय़ा हा विषयच उद्योगाला एक कलाटणी देणारा ठरणार आहे.
मुळात वीजेचा असा वापर हा नवा नाही. आताच काही त्याचा शोध लागलेला आहे, असे म्हणता येणार नाही. १९०४ मध्ये प्रथम जर्मनीती वीजेवरील ही मोटार चालविली गेली होती. तसेच पेट्रोलसारख्या इंधनाच्या वापरातून तयार केल्या जाणाऱ्या इंजिनांपूर्वी वीजेच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या या वाहनांच्या संशोधनातून अनेक बाबी सिद्ध झालेल्या आहेत. पण त्याची गरज आम्हाला भासली नाही. गतीसाठी गॅसोलीनचा वापर अधिक होऊ लागला. आणि आता या पेट्रोल व डिझेलसारख्या इंजिनाच्या किंमती गगनाला भिडू लागल्यावर, त्यांचा पृथ्वीच्या पोटातील साठा कमी होत असल्याचे निष्पन्न होऊ लागल्यावर, पर्यावरणाची चिंता करू लागल्याने पुन्हा एकदा विजेच्या या वापराची बचतक्षम आठवण होऊ लागली आहे. इलेक्ट्रिक स्टार्टर हा त्या प्रकारामधील सुरुवातीचा शोध या दिशेने जाणारा होताच.
अंतर्गत ज्वलनाद्वारे तयार होणाऱ्या ऊर्जेद्वारे चालणाऱ्या पेट्रोल इंजिनाने मोठय़ा प्रमाणात उत्पादन तयार करण्याचे कौशल्य सिद्ध केले गेले त्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित झाले असल्याचे दिसते. त्यामुळे वीज वापरून त्याद्वारे फ्युएल सेल्सवर ऊर्जा घेऊन त्याचा वापर मोटारीच्या पेट्रोल वा डिझेल इंजिनाऐवजी वीजेवरील मोटरमध्ये होत असतो. त्या मोटरीतून गती मिळत असते.
मोठय़ा रस्त्यांवरही वीजेच्या वापरातून चालविली जाणारी मोटार सक्षम असली पाहिजे. या अनुषंगाने टेस्ला रोडस्टार, रेवा आय, बडी, मित्सुबिशी आय मिएनव्ह, निस्सान लीफ, स्मार्ट ईडी, व्हीगो व्हीप लाईफ, मिआ इलेक्ट्रिक, बीवायडी ई ६, रेनॉल्ट फ्लुएन्स ईडी, फोर्ड फोकस इलेक्ट्रिक, बीएमडब्ल्यू अ‍ॅक्टिव्ह ई, कोडा, टेस्ला मॉडेल एस, होंडा फिट ईव्ही, रेनॉल्ट झोव्ह ई या विजेवर चालणाऱ्या गेल्यावर्षांपर्यंत युरोपात दिसून आल्या आहेत. निस्सान लीफच्या ४८ हजार मोटारी जगात गेल्यावर्षी डिसेंबर २०१२ पर्यंत विकल्या गेल्या होत्या. हा आकडा पाहिला म्हणजे विजेवर चालणाऱ्या मोटारी उपयुक्त आणि विपणनात चांगल्या प्रभावी ठरल्या असल्याचे म्हणावे लागते.    
(क्रमश:)
– रवींद्र बिवलकर
ravindrabiwalkar@gmail.com

First Published on January 31, 2013 12:51 pm

Web Title: now target is electric car