मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरविण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहे.
३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे. कलम ११२, ११३, १२१, १२२, १२५, १३२, १३४, १८५, १८६, १९४, २०७.
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत.
६) कलम १३२- काही विशिष्ट प्रकरणांमध्ये वाहनचालकाचे वाहन थांबवण्याचे कर्तव्य : २) मोटार वाहनचालकाने जर एखादी व्यक्ती जी स्वतचे नाव आणि पत्ता देत आहे अशा व्यक्तीने जर वाहनचालकावर त्याने मोटार वाहन कायदा कलम १८४ भंग होईल असा गुन्हा केला आहे असा आरोप केला असेल, अशा व्यक्तीने मागणी केल्यावर स्वतचे नाव आणी पत्ता देणे बंधनकारक आहे.
३) या कलम १३२मध्ये प्राणी या शब्दाचा अर्थ घोडा, गुरे, हत्ती, उंट, गाढव, खेचर, तट्ट, बकरी किंवा मेंढी असा होतो़.

संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे</strong>

क्रमश: