मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३२ मुख्य नियम आहेत. त्यापकी नियम क्रमांक २१ व २२ खाली देण्यात येत आहे.
२१) हॉर्नचा वापर आणि शांतता क्षेत्र : कोणत्याही वाहनाच्या चालकाने खालील परिस्थितीत हॉर्न वाजवू नये :-
* सुरक्षितता राखण्यासाठी गरज नसताना, न थांबता सतत, गरजेपेक्षा जास्त हॉर्न वाजवू नये.
* शांतता क्षेत्रामध्ये हॉर्न वाजवू नये;
* एक्झहास्त पाइपच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कट ऑफद्वारे एक्झहास्त ॠं२ काढण्यास परवानगी देऊ नये
* मल्टी टोन हॉर्न किंवा कर्कश्श हॉर्न, तीव्र आवाजाचा हॉर्न, मोठय़ा आवाजाचा हॉर्न किंवा भीतीदायक आवाजाचा हॉर्न वापरू नये.
* वाहतूक होताना अनावश्यक आवाज करणारे वाहन चालवू नये.
* सायलेन्सरला मफलर लावून घाबरवणारा भीतीदायक आवाज करणारे वाहन चालवू नये.
२२) वाहतूक चिन्हे आणि वाहतूक पोलीस :
वाहनाचा चालक तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्या इतर नागरिकांनी खालील नियम पाळावे .
* एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा अधिकारप्राप्त अधिकाऱ्याने हाताने किंवा सिग्नलच्या साह्याने दिलेल्या इशाऱ्यांचे पालन करावे.
* रस्त्यावर उभारण्यात आलेल्या वाहतूक नियमनासाठी असलेल्या चिन्हांचे पालन करावे.
* दोन किंवा त्यापेक्षा जास्त रस्ते मिळणाऱ्या चौकामध्ये असलेल्या स्वयंचलित सिग्नलद्वारे दिलेल्या इशाऱ्याचे पालन करावे. क्रमश: