संजय डोळे
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावेत हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत, त्यांपकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहे.
३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे- कलम ११२, ११३, १२१, १२२, १२५, १३२, १३४, १८५, १८६, १९४, २०७.

सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत-
कलम १३४ : अपघात घडणे आणि व्यक्तीला किंवा व्यक्तींना इजा होणे अशा परिस्थितीमध्ये मोटार वाहनाच्या चालकाचे कर्तव्य : जेव्हा एखाद्या मोटार वाहनाचा अपघात झाला असेल आणि या अपघाताच्या परिणामस्वरूप व्यक्तींना इजा झाली असेल किंवा त्रयस्थ पक्षाच्या मालमत्तेची हानी झाली असेल अशा परिस्थितीमध्ये मोटार वाहनाच्या चालकाने किंवा वाहनाचा ताबा ज्याच्याकडे सोपवलेला आहे अशा व्यक्तीने
ब ) पोलीस अधिकाऱ्याला त्याने मागितलेली कोणतीही माहिती दिली पाहिजे, अथवा जर पोलीस अधिकारी नसेल तर घडलेल्या घटनेतील परिस्थितीनुसार जर अपघातातील कोणत्याही जखमी व्यक्तीला वैद्यकीय मदतीसाठी इस्पितळात नेता आले नाही अशा परिस्थितीत नजीकच्या पोलीस स्टेशनला घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबाबत त्वरित कळवावे, तसेच कोणत्याही परिस्थितीत चोवीस तासांच्या आत पोलीस स्टेशनला कळवावे.
क) विमा ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीला अपघाताच्या घटनेबाबत लेखी कळवावे आणि त्या कंपनीला खालील माहिती कळवावी –
१) विमाचा क्रमांक तसेच विम्याची मुदत.
२) अपघात झाल्याची तारीख, वेळ आणि जागा.
३) अपघातात जखमी झालेल्या किंवा मयत झालेल्या व्यक्तींचा तपशील.
४) वाहनाच्या चालकाचे नाव आणि त्याच्या वाहन चालवण्याच्या परवान्याचा तपशील. स्पष्टीकरण – या कलमासाठी वाहनचालक या शब्दाच्या अर्थामध्ये वाहनाच्या मालकाचादेखील समावेश होतो. क्रमश: