’डॅटसन आणि पुण्टो यापकी कोणती कार घेणे अधिक सोयीस्कर ठरेल? तसेच रेनॉ डस्टर, निस्सान टेरानो आणि फोर्ड इकोस्पोर्ट यापकी कोणता पर्याय अधिक चांगला ठरेल?
– राहुल कदम

’डॅटसन ही लो कॉस्ट कार आहे, तर पुण्टो त्यापेक्षा महाग आहे. तुम्हाला डिझेल कार घ्यायची असेल, तर तुम्ही पुण्टो, टाटा झेस्ट, होंडा जॅझ यापकी कोणत्याही एका गाडीची निवड करा. एसयूव्ही घ्यायची असेल तर ुंदाई क्रेटा घ्या.

’आमच्या कुटुंबामध्ये आम्ही दहा जण आहोत. आम्ही अलीकडेच मिहद्रा एक्सयूव्ही५०० ही सेकंड हँड गाडी बुक केली. ती आमच्यासाठी चांगली आहे का? कृपया मार्गदर्शन करा. गाडय़ांचे आम्हाला फारसे ज्ञान नाही.
 – विजय देशमुख

’एक्सयूव्ही५०० ही सर्वोत्तम कार आहे, यात शंकाच नाही; परंतु त्यात तुम्ही फक्त आठच जण बसू शकाल. त्यामुळे तुम्ही आधी गाडी बघून घ्या आणि नंतरच तिच्या खरेदीचा विचार करा.

’मला इलाइट आय२० आणि एक्सेंट या गाडय़ा आवडतात. कोणती घ्यावी?

– जनार्दन खोतरे

’एक्सेंटपेक्षा नक्कीच आय२० इलाइट ही गाडी चांगली आहे, पण चांगला मायलेज देणारी डिझेल कार घ्यायची असेल, तर होंडा जॅझ किंवा फोर्ड अस्पायर घ्यावी.

’मी ग्रामीण भागात राहत असून मला सात किंवा आठ आसनी एसयूव्ही गाडी घ्यायची आहे, जेणेकरून खराब रस्त्यावर काही अडचण येणार नाही. स्कॉíपओ किंवा लॉजी यामध्ये मला गोंधळ आहे. माझा जास्त गाडीचा वापर होत नाही. मात्र, कुटुंब मोठे असल्याने कुठे जायचे असेल, तर महिन्यातून एक-दोनदा २००-३०० किमी रिनग ते आणि शेतात रोज न्यावी लागते गाडी, तोही आडवळणाचा रस्ता आहे.

– गीतांजली डोंगरे

’तुम्ही स्कॉíपओ गाडी घ्या, पण त्यातल्या त्यात आठ जण बसू शकतील अशी गाडी म्हणजे झायलो आहे. तिच्यात तुम्हाला जास्त आराम मिळू शकेल आणि खडकाळ वगरे रस्त्यांवरही ही गाडी चांगली चालते, पण जर तुम्हाला पाच आसनी गाडी चालत असेल, तर नक्की ुंदाई क्रेटा घ्यावी.

’मी परदेशात नोकरीला असून वर्षांतून दोन महिने भारतात असतो. मला माझ्यासाठी सुट्टीमध्ये फिरण्यासाठी तसेच बायकोला काही किरकोळ प्रवासासाठी कार घ्यायची आहे. मला शेवल्रेची सेल ही पेट्रोल गाडी आवडली. कृपया त्या कारविषयी अधिक माहिती द्यावी. हॅचबॅक सेग्मेंटमधील इतर कोणती चांगली कार आपण सुचवू शकता? माझे बजेट ७ लाखांपर्यंत आहे आणि मला हॅचबॅक सेग्मेंटमधील आकाराने मोठी कार हवी आहे.

– सचिन कुली

’शेवल्रे सेल एचबी ही उत्तम आणि प्रशस्त गाडी आहे. त्यात एबीएस एअरबॅग्ज, अलॉय व्हील्स अशा सुविधा आहेतच, शिवाय ही गाडी सात लाखांत आरामात मिळेल. त्यांची पाच वर्षांची वॉरंटी ही खूप फायदेशीर आहे. सíव्हस स्कीम्सही चांगल्या आहेत, पण एकदा होंडा जॅझची ट्रायल घ्यावी. तिचे टॉप मॉडेल साडेसात लाखांपर्यंत जाईल.