’मला सेडान घ्यायची आहे. टोयोटा इटिऑस, होंडा सिटी आणि होंडा अमेझ यांपकी कोणती गाडी माझ्यासाठी सर्वोत्तम ठरेल? माझे बजेट साडेसात लाख रुपये आहे.
– संजय बारी

’तुम्ही इटिऑस गाडी घ्या. ही सर्वोत्तम सेडान कार आहे. हिचा बूट स्पेसही खूप मोठा आहे. वजनानेही हलकी आहे. मायलेजही चांगला आहे आणि पाच जण आरामात बसू शकतात.
’स्विफ्ट व्हीएक्सआय, डिझायर व्हीएक्सआय, बालेनो सिग्मा पेट्रोल आणि बालेना डेल्टा पेट्रोल या चार पर्यायांपकी मी कोणती गाडी घ्यावी? मला असे समजले आहे की, बालेनो ही वजनाने हलकी आहे आणि तिचे दरवाजे वगरे खूप बारीक पत्र्याने बनवलेले आहेत. त्यामुळे ती लगेचच तुटू शकते. खरे काय? कृपया सांगा.
 अमित

’मारुतीच्या सर्वच गाडय़ा वजनाने हलक्या आहेत. तुमचे रिनग जर शहरातच असेल तर तुम्ही बालेनो घ्यायला काहीच हरकत नाही. पण जास्तीत जास्त रिनग हायवेलाच असेल तर मात्र फोक्सवॅगन पोलो ही कार घ्यावी. ही गाडी रस्ता सोडत नाही.
’कृपया मी कोणती कार घेऊ सांगा. माझे मासिक ड्रायिव्हग एक हजार किमी आहे. मात्र, ते नियमित नाही. त्यामुळे मी पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेल. टोयोटा कोरोला, फोक्सवॅगन जेटा आणि स्कोडा अ‍ॅक्टिव्हा यांपकी कोणती गाडी घेऊ.
– सचिन कुलकर्णी

’तुमचे बजेट २० लाख रुपये असेल तर नक्की फोक्सवॅगन जेटा घ्या. तिचे सस्पेन्शन खूप चांगले आहे. शिवाय दणकट गाडी आहे. तुम्ही सेव्हन स्पीड ऑटोमॅटिक गाडी घ्या.
’मला माझ्या पत्नीसाठी छोटी कार घ्यायची आहे. आमचे बजेट पाच लाख रुपये आहे. तसेच रोजचे रिनग दहा ते २५ किमी आहे. तसेच महिन्यातून दोनदा तरी आम्ही बाहेरगावी जात असतो. आम्ही पेट्रोल गाडी घ्यावी की डिझेलवर चालणारी. क्विड हा चांगला पर्याय ठरू शकतो का. मारुती किंवा ह्युंडाईचा पर्यायही चांगला आहे का? कृपया मार्गदर्शन करा.
– प्रतापसिंह तिडके

’तुम्ही ऑटो ट्रान्समिशन कार पाहात असाल तर कृपया तुम्ही मारुती सेलेरिओ घ्या. मात्र, तुम्हाला मॅन्युअलवर चालणारी गाडी हवी असेल तर होंडा ब्रायो ही गाडी उत्तम पर्याय आहे. पेट्रोलवर चालणारी ही गाडी उत्तम मायलेज देते शिवाय पॉवर आणि इंजिनही चांगले आहे.
’होंडा सिटी पेट्रोलमध्ये चांगली की डिझेलमध्ये.
– श्रीकांत कवाडे

’होंडा सिटी पेट्रोलमध्येच चांगली. तिचे आयव्हीटेक इंजिन जगात उत्तम आहे. मात्र, तुमचे रिनग खूपच असेल तर
मग डिझेलमध्ये तुम्ही मारुतीची सिआझ घ्या. टोयोटा इटिऑस हाही एक चांगला पर्याय आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.