पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असलेल्या पाच राज्यांमध्ये निरीक्षण आणि खर्चावर देखरेखीसाठी निवडणूक आयोगाने नेमलेल्या पथकांनी ८० कोटी रुपयांहून अधिक रोकड, ३ लाख लिटर दारू आणि साडेसहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, यापैकी सर्वाधिक उत्तर प्रदेश व पंजाब येथील आहेत.

बुधवापर्यंत संकलित केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सर्वाधिक ७१.३२ कोटी रुपये (३१.६५ लाख जुन्या नोटांमध्ये) उत्तर प्रदेशात जप्त करण्यात आले असून, पंजाबमध्ये ८.८१ कोटी, उत्तराखंडमध्ये २५.५४ लाख तर मणिपूरमध्ये ६.९५ लाख रुपये जप्त झाले आहेत.

Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Sanjay Raut ANI
“मविआचं जागावाटप पार पडलं, तिन्ही पक्षांमध्ये…”, बैठकीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; वंचितच्या मागणीवर म्हणाले…
Infrastructure boosts real estate sector
पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
chemotherapy centers Maharashtra
आरोग्य विभागाची राज्यात ३५ जिल्ह्यांत डे-केअर केमोथेरपी केंद्र! टाटा कर्करोग केंद्राबरोबर सामंजस्य करार…

याशिवाय मतदारांना गळाला लावण्यासाठी वापरली जाण्याचा संशय असलेली ७.७१ कोटी रुपयांची तब्बल २.७१ लाख लिटर दारू निवडणूक आयोग नियुक्त पोलीस व उत्तर प्रदेशातील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी जप्त केली आहे. पंजाबमध्ये ११८०९ लिटर (किंमत २०.०४ लाख) आणि उत्तराखंडमध्ये ६२८४ लिटर (किंमत १६.५३ लाख) इतकी दारू जप्त करण्यात आली आहे.

अमली पदार्थ प्रतिबंधक यंत्रणा आणि पोलीस यांच्या पथकाने अमली पदार्थाचा सर्वाधिक म्हणजे ५.५४ कोटी रुपये किमतीचा साठा पंजाबमध्ये जप्त केला असून, त्याखालोखाल उत्तर प्रदेश (६८.१४ लाख), गोवा (१६.७२ लाख), उत्तराखंड (९.६६ लाख) व मणिपूर (७ लाख) यांचा क्रमांक आहे.