दि एक्स्प्रेस लघुपट महोत्सव
आजवर भारताने कधीही अनुभवलेले नाहीत, असे आगळेवेगळे लघुपट आपण प्रवेशिका म्हणून पाठवलेत. ते केवळ उत्कृष्टच नव्हेत तर प्रेरणादायीही आहेत. आपण दिलेल्या या उत्स्फूर्त, उत्साहपूर्ण प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आमचे मान्यवर परिक्षक
1. 4shared.com या संकेतस्थळावर जा
2. तुमच्या ईमेल आयडीच्या सहाय्याने नवीन खाते (अकाऊंट) बनवा. (या संकेतस्थळावर आधीच तुमचे खाते (अकाऊंट) असेल तर पुन्हा नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही.)
3. नवीन खाते बनवल्याचा तुम्हाला खात्रीचा (कंफरमेशन) ईमेल येईल. (ज्यांचे आधीच खाते आहे त्यांनी वरील दोन (२-३) पाय-या करण्याची आवश्यकता नाही.)
4. आता तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगइन करा. (लॉगइन केल्यानंतर तुमच्यासमोर ‘4shared’ संकेतस्थळाचा डॅशबोर्ड येईल.)
5.‘अपलोड’ बटनावर क्लिक करा. ( ‘फाईल अपलोड’ असा डायलॉग बॉक्स स्क्रिनवर दिसेल)
6.तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर जेथे फाईल सेव्ह केली आहे तेथे जा, ती फाईल सिलेक्ट करा आणि ‘ओपन’ वर क्लिक करा. (4shared.com अपलोडिंग चालू करेल, जोपर्यंत अपलोडची प्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत वाट पहा.)
(अपलोड पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या अपलोड केलेल्या फाईलचे नाव डॅशबोर्डवर दिसेल.)
7. आता, फाईलच्या नावावर राईट क्लिक करा आणि ‘गेट लिंक’ (Gat Link) सिलेक्ट करा.
8. ती यू.आर.एल. (URL) कॉपी करून प्रवेश अर्जावर नमूद (पेस्ट) करा.
मराठी हिंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांमध्ये केलेल्या संस्मरणीय अभिनयामुळे सोनाली कुलकर्णी हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे दिल चाहता है सिंघम टॅक्सी नंबर ९२११ मिशन कश्मिर दिल विल प्यार व्यार कैरी अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या बहारदार अभिनायासाठी त्यांना सर्वच लोक ओळखतात चित्रा या मराठी लघुपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना २००२मध्ये ४९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये परीक्षकांच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
त्याचप्रमाणे सोनाली कुलकर्णी यांना आतापर्यंत पदार्पणासाठीचा फिल्म फॅन असोसिएशनचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा व्ही शांताराम पुरस्कार मुक्ता या चित्रपटासाठी राज्य सरकारचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याचप्रमाणे मिलान चित्रपट महोत्सवातफुकोडी सु मी फायर एट माय हार्ट या चित्रपटासाठीही त्यांना पुरस्कार प्राप्त झाला होता.
भारतात दर्जेदार जाहिराती बनवणाऱया फिल्म मेकर्समधील एका वरच्या दर्जाचे नाव म्हणजे अभिनय देव. जाहिराती बनवता बनवता अभिनय देव यांनी चित्रपट दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. आतापर्यंत अभिनय देव यांनी ४५०हून अधिक जाहिराती बनवल्या आहेत. त्यांचा पहिला चित्रपट २०११मध्ये आलेला गेम. त्यानंतरचा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे देल्ली बेल्ली. हा चित्रपट लॉस एन्जेल्समधील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पदार्पणासाठीचा पुरस्कारही मिळाला.
अभिनय देव यांना आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये ब्रिटनमध्ये नावाजला गेलेला डी एण्ड अॅड, कान्स पुरस्कार, लंडन चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, अमेरिकेतील वन शो पुरस्कार आणि न्युयॉर्क चित्रपट महोत्सवातील चार पुरस्कारांचा समावेश आहे. अमेरिकन टेलिव्हीजनवर अत्यंत लोकप्रिय असलेली २४ ही मालिका आणि तीन चित्रपट यांचे दिग्दर्शन अभिनय देव पुढील तीन वर्षांत करणार आहेत.
मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून सुवर्णपदक पटकावलेल्या भूपाळ रामनाथकर यांनी १९८३मध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात एण्टरप्रायझेसपासून केली. तेव्हापासून त्यांनी डीडीबी नीधम, दुबई, मुद्रा डीडीबी एण्ड लिओ बर्नट, मुंबई आणि एण्टरप्रायझेस नेक्सस अशा अनेक कंपन्यांमध्ये आपल्या कल्पकतेने भरारी मारली. त्यांनी आतापर्यंत कान्स लान्स, वन शो, क्लिओ, न्यूयॉर्क फेस्टिवल, लंडन इंटरनॅशनल एडव्हर्टायझिंग एवॉर्ड आणि एशिया पॅसिफिक एड फेस्ट अशा विविध महोत्सवांमध्ये २०० राष्ट्रीय आणि ७५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.
कॉम्प्लॅन या कंपनीसाठी त्यांनी केलेल्या कामगिरीला एडव्हर्टायझिंग क्लब ऑफ मुंबईने भारतीय जाहिरात क्षेत्रात यंदाच्या शतकातील महत्त्वपूर्ण कामगिरी या शब्दांत गौरवले आहे. वन शो हा अमेरिकेतील पुरस्कार पटकावणारे ते पहिले भारतीय आहेत. त्याप्रमाणे कान्समधील परदेशी वर्गाचे परीक्षक म्हणून नेमणूक होणारेही ते पहिलेच भारतीय आहेत.
भारतीय जाहिरात क्षेत्रातील अग्रणी नाव म्हणून गोपी कुकडे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ एप्लाइड आर्टस् या संस्थेमधून त्यांनी सुवर्णपदकासह आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. जाहिरात क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी एडव्हर्टायझिंग एव्हेन्यूज सुरू करणाऱयांपैकी ते एक आहेत. एशियन पेण्ट्स, ग्लॅक्सो, स्टॅनरोज फॅब्रिक्स, सेंटॉर हॉटेल, हॉकिंग्ज प्रेशर कुकर अशा अनेक जाहिरातींमागील कल्पक हात त्यांचाच होता. त्यांचे सर्वात कल्पक आणि यशस्वी असे प्रोडक्ट म्हणजे ओनिडाचा राक्षस.
पुणे विद्यापीठातून रंगभूमी विषयात आपले शिक्षण पूर्ण करणाऱया मंगेश यांनी मुंबईत येण्याआधी पुण्यात रंगभूमीवर खूप काम केले. कठीण परिस्थितीतही आनंद शोधणारी पात्र आणि मानवी भावभावना हे मंगेश हाडवळे यांच्या कलाकृतींमधील महत्त्वाचे घटक आहेत. मंगेश हाडवळे यांचा पहिला चित्रपट टिंग्या हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. एवढेच नव्हे, तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद यांसाठी हाडवळे यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. देख इंडियन सर्कस हा त्यांचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाला बुसान चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये या चित्रपटाने गोल्डन प्लेक उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही पटकावला आहे.
सोनाली
अभिनय
भूपाल
गोपी
मंगेश