पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी भक्तांचा आग्रह;  सामाजिक प्रबोधनावर भर

कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सवासाठी लागणारे मखर, मंडप सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्री करणारी प्रदर्शने काही दिवसांपासून भरू लागली आहेत. त्यात हजेरी लावणारे बहुसंख्य भाविक पर्यावरणस्नेही मखर, मखरासाठी लागणारी आरास, तसेच शोभेच्या वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या शंभर शोभिवंत मखरांपैकी कागदाचा लगदा, पुठ्ठे, कागद आणि कापडांपासून तयार केलेली वेलबुट्टीची फुले भक्तांना सध्या भावत आहेत. यात शाडूच्या मूर्तीनाही मोठी मागणी आहे.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार
Dahanu, Fishermen, Catches, Ghol Fish, Worth Lakhs, Valuable, sea, marathi news,
डहाणूच्या मच्छीमारांच्या जाळ्याला लाखोंचा घोळ

मूर्ती कारखान्यांमध्ये तसेच विक्रेत्यांकडे भाविक शाडूच्या मूर्तीची मागणी करीत आहेत.

पर्यावरण संवर्धन हा त्यामागील उद्देश आहे. कल्याण-डोंबिवली शहरात विविध संस्थांच्या पुढाकाराने गेल्या काही वर्षांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर, थर्माकोलमुळे निसर्गाची होणारी हानी, नद्यांमधील प्रदूषण याविषयी सातत्याने प्रबोधन केले जात असते. यासंबंधची व्याख्याने, पथनाटय़ांचे प्रमाणही वाढले आहे.

पर्यावरण दक्षता मंच, ऊर्जा फाऊंडेशन, कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे शहर स्वच्छता, प्लॅस्टिक निर्मूलन, जलसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम सतत राबविले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून गणेश भक्तही शाडूच्या गणेशमूर्ती, कागदाने, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले मखराचे साहित्य खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. पर्यावरणस्नेही मखर आकर्षक, कागदांपासून तयार केलेले व माफक दरात असल्यामुळे भाविक हे मखर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, असे अनेक मखर विक्रेत्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवली परिसरातील काही मूर्तिकार पर्यावरण पोषक सण साजरे व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. मूर्तिकार संदीप लोंढे शाडूच्या मूर्तीचा वापर वाढावा यासाठी प्रसार करीत असून त्यासंबंधीचे सादरीकरण कार्यशाळा ते आयोजित करीत आहेत. लोंढे यांनी गेल्या वर्षांपासून डोंबिवलीत शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा सुरू केली आहे.

अनेक वर्षांपासून आम्ही सहकारी मित्र मखर प्रदर्शन व विक्रीचा व्यवसाय करतो. यापूर्वी थर्माकोलच्या मखरांना भाविक प्राधान्य देत असत. यंदा प्रदर्शनात येणारा भाविक पर्यावरणस्नेही मखर, शोभेच्या वस्तू खरेदी करण्यास सर्वाधिक प्राधान्य देताना दिसत आहेत.

– मयूरेश गद्रे, मखर विक्रेते