गणपतीमध्ये विशेषतः हरतालिका, ऋषीपंचमी, गौरीपूजन यांना विशिष्ट पत्री वाहिल्या जातात. या पत्रींना धार्मिक महत्त्व असले तरीही त्याचे शास्त्रीय महत्त्वही जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत पूजेला आणि देवाला फुले, पाने वाहण्यास विशेष महत्त्व आहे. देवतेनुसार यामध्ये बदलही होतात. गणेशोत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपला असताना बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या या पत्रींविषयी माहिती करुन घेणे गरजेचे आहे.

आता पत्री म्हणजे नेमके काय तर जी पाने गणपतीला आपण भक्तीभावाने वाहतो त्याला शास्त्रीय भाषेत पत्री म्हटले जाते. या पत्रीमुळे वातावरण शुद्ध होते असे मानले जाते. इतकेच नाही तर या पत्रींपैकी अनेक पत्रींचा आरोग्यासाठीही विशेष उपयोग होतो. गणपतीला २१ पत्री वाहिल्या जातात. विशेष म्हणजे या काळात या पत्री सहज उपलब्धही होतात. पूर्वी गावाच्या ठिकाणी लोक स्वतः या पत्री तोडून आणत असत पण सध्या शहरीकरणामुळे झाडांचे प्रमाण जवळपास नाहीसे झाल्याने या पत्री बाजारातून विकत आणून वाहिल्या जातात. यामध्ये दुर्वा, पिंपळ, बेल, शमी, धोत्रा, तुळस, आघाडा, रुई, अर्जुन, कण्हेर, जाई, मालती, माका यांसारख्या पानांचा समावेश असतो. एकिकडे गणपतीला ही पाने वाहिलेले चांगले असतात असे म्हणत असताना प्रत्यक्षात ही सर्व पाने आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे आपल्याला दिसून येईल.

Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

पिंपळ बुद्धिवर्धक, रक्तशुद्धीकारक तसेच त्वचा, पोट व दंतविकारावर गुणकारी आहे. टॉन्सिल्सच्या आजारात बेलाच्या पानांचा काढा उपयोगी असतो. याची फळे मेंदू व हृदयाच्या स्वास्थ्यासाठी शक्तिवर्धक आहेत. गणपतीच्या काळात पावसाळा असल्याने विविध संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, अशावेळी हे उपाय निश्चित उपयुक्त ठरु शकतात. शमीमुळे शरीरातील उष्णतेचा नाश होतो. साल उगाळून लावल्यास व्रण जातात. दुर्वा या थंड असतात. महिलांच्या मासिक पाळी समस्येसाठी दुर्वांचे पाणी अतिशय उपयुक्त असते. जखमेवर पानांचा लेप केल्यास रक्त वाहणे बंद होते. घोणा फुटल्यावर नाकात दुर्वांचा रस घालतात. नागिणीवर दूर्वा वाटून लावतात व रस पोटात देतात, दाह कमी होतो. धोत्रा दमा, आकडी, फुफ्फुसाच्या नळ्या सुजणे, स्नायूंचे झटके यावर गुणकारी असतो.

घरगुती उपचारात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असून त्याचा विविध विकारांवर उपयोग होतो. तुळशीची पाने उष्ण तर बी शीतकारक आहे. तुळशीची माती कीटकदंशावर उपयुक्त आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी माका उगवतो. माक्यामध्ये पाचक, कृमिनाशक व कफनाशक असे गुण आहेत. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. विंचू दंश,त्वचाविकार, मूळव्याध, कावीळ, सूज अशा अनेक विकारांवर ही वनस्पती गुणकारी आहे. आघाडा हा स्त्रियांच्या रोगावर विशेष उपयुक्त असतो. श्रावणात जिवतीला यासाठीच पाने वाहतात. पावसाळ्यात छातीत साठणाऱ्या कफावर याचे क्षार उपयोगी असतात. अर्जुन या वनस्पतीत नैसर्गिक कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. अस्थी जोडण्यासाठी, त्यास मजबुती येण्यासाठी सालीचे चूर्ण वापरतात.

केवड्याची पाने, फुले विशेषतः गौरीसाठी वापरली जातात. केवड्यामुळे बुद्धी वाढते, फुलांच्या रसामध्ये तयार केलेल्या तुपाच्या सेवनाने मूत्रमार्गाचे रोगनिवारण होते. मालती मुखरोगावर अत्यंत उपयोगी असते. जाईच्या पानांच्या काढ्याने जखम धुवून त्यावर वाटलेली पाने लावली असता जखम बरी होते, तोंड आलेले बरे होते.