पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी प्रशासनासह सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्न होत असताना हा धागा पकडून येथील नेचर क्लब ऑफ नाशिकच्यावतीने १९ व २० ऑगस्ट या कालावधीत अनोख्या गणेश मूर्तीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे गणेशाच्या दहा हजारहून अधिक सूक्ष्म मूर्ती एकाच छताखाली गणेश भक्तांना पाहावयास मिळतील.

सिन्नर येथील कलावंत संजय क्षत्रिय यांनी तयार केलेल्या तब्बल दहा हजार विविध प्रकारच्या शाडू मातीच्या मूर्ती प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहे. रंगकाम करणाऱ्या क्षत्रिय यांनी आर्थिक स्थिती बेताची असताना निर्मिती केलेल्या शाडूमातीच्या गणेश मूर्ती या कलाकुसरचा उत्तम नमुना आहे. कोणताही राजाश्रय वा लोकाश्रय नसताना त्यांनी स्वखर्चाने आपल्या कलेची जोपासना केली आहे. त्यांच्या कलेचा सन्मान व्हावा व शाडूमाती मूर्तीचा प्रचार व्हावा, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा आनंद बोरा यांनी सांगितले. प्रदर्शनात क्षत्रिय यांनी खडू, रंगीत माती यांच्या मदतीने निर्मिलेली गणेशाची विविध रुपे सर्वाचे लक्ष वेधून घेतील. क्षत्रिय यांनी आजपर्यंत तब्बल ३३ हजार विविध प्रकारच्या सूक्ष्म आकारातील गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. त्यात नाचणारे गणेश, बासरी, तबला वाजविणारे गणेश यासह सुपारीवर गणेश मूर्ती, नखावरील गणेश मूर्ती, ५१ लहान हत्ती, ८१ गणपतींची दहीहंडीदेखील बघावयास मिळणार आहे. प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे साडे तीन लाख सुवर्ण मण्यांपासून निर्मिलेली अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती. ही प्रतिकृती कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आहे. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वासाठी खुले आहे. नागरिकांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
young man committed suicide as he did not want to marry
खळबळजनक! लग्न करायचं नसल्याने नवरदेवाने केली आत्महत्या; आत्महत्येपूर्वी मामाला…
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”