वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांचे तब्बल ४७ हजार पुडे आणि आंब्याच्या स्वादाच्या साडेसहा हजार गोळ्या वापरून केलेली आकर्षक सजावट, लहान मुलांबरोबरच मोठय़ांचेही लक्ष वेधून घेत आहे. ग्राहक पेठेतर्फे ही सजावट करण्यात आली आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे निमित्त साधून गणपतीच्या सजावटीत कन्याकुमारी येथील शिलास्मारकाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यासाठी  बिस्किटांचे पुडे आणि गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. ग्लूकोज, मारी, चॉकलेट, कोकोनट, तसेच खाऱ्या बिस्किटांचे ४७६३२ पुडे सजावटीत वापरण्यात आले आहेत. या प्रतिकृतीबरोबरच महिला सबलीकरणाविषयी फलक लावून जनजागृती करण्यात आली आहे.
 ग्राहक पेठेच्या सेवक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण गुंजाळ असून सजावटीची जबाबदारी प्रफुल्ल जाधवर यांनी वाहिली आहे.