गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; अशा गजरात जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या विसर्जनादरम्यान कुठल्याही अनुचित घटनेची नोंद झाली नाही.
नांदेड शहर व जिल्ह्यात सुमारे दोन हजार गणेश मंडळांच्या वतीने श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेश चतुर्थीपर्यंत जिल्ह्यात पावसाची वक्रदृष्टी होती पण गणरायाच्या आगमनानंतर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर आल्याने गणेशोत्सवादरम्यान उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी अनंतचतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांनी गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात विघ्नहर्त्यांला निरोप दिला.
सकाळपासूनच विविध भागातून मिरवणुकांना प्रारंभ झाला. गोवर्धनघाट, बंदाघाट, नगीनाघाट, सांगवी व पासदगाव आदी भागात गोदावरी व आसना नदीपात्रात लाडक्या बाप्पाचे विसर्जन झाले. दुपारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. ढोल-ताशाच्या गजरात गुलाल उधळत व गणपतीबाप्पा मोरयाचा गजर करीत निघालेल्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. शहरात ठिकठिकाणी गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात अनेक वेळा पावसाने हजेरी लावली पण गणेशभक्तांच्या उत्साहावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नांदेड शहरात श्री विसर्जनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वत: पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया, सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या भागात तळ ठोकून होते.

Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
nashik lok sabh seat, Shiv Sena, Ajay Boraste, Emerges as Potential Contender, Amidst maha yuti Conflict, ajay boraste visits thane, ajay boraste, eknath shinde shivsena, bjp
नाशिकच्या जागेचा तिढा अन् अजय बोरस्ते यांची ठाणेवारी
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”