गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून विसर्जन मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष राहणार आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असल्यामुळे लक्ष्मी, टिळक, कुमठेकर, शिवाजी, केळकर आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवली जाणार आहे.
गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीसाठी १४ पोलीस उपायुक्त, ३९ सहायक पोलीस आयुक्त, ४८ पोलीस निरीक्षक, २६५ सहायक पोलीस निरीक्षक आणि फौजदार आणि अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहील. तर, पोलीस ठाण्याच्या स्तरावर साडेचार हजार पोलीस कर्मचारी आणि पाचशे महिला पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्याबरोबरच साडेतीनशे होमगार्ड, शिघ्र कृती दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रक पथक दल, राज्य राखील दल यांच्या प्रत्येकी एक तुकडय़ा बंदोबस्तामध्ये सहभागी होणार आहेत. त्याबरोबरच बॉम्बशोधक व नाशक विभागाची सहा पथके विसर्जन मिरवणुकीस बंदोबस्तमध्ये तैनात असतील. तसेच, चार हजार पोलीस मित्र पोलिसांच्या मदतीसाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेकडून देण्यात आली.
विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत रस्ते बंद
गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी, टिळक, केळकर आणि कुमठेकर रस्ते वाहतुकीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्या बरोबरच शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, फग्युर्सन रस्ता, भांडारकर रस्ता सोमवारी दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील. स्वारगेट परिसरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे सोमवारी सकाळी आठपासून पुणे-सातारा रस्ता आणि शंकर शेठ रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
 पादचाऱ्यांसाठी एकेरी रस्ते
  विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे पादचाऱ्यांसाठी एकेरी मार्ग करण्यात आले आहेत. शिवाजी आणि लक्ष्मी रस्ता हे पादचाऱ्यांसाठी एकेरी असतील. टिळक चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी राहील. तर, टिळक, बाजीराव कुमठेकर आणि केळकर हे रस्ते पादचाऱ्यांसाठी  दुहेरी ठेवण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी लक्ष्मी, टिळक, केळकर, शास्त्री, कुमठेकर रस्ते आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर शंभर मीटरच्या परिसरात वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.
 वैद्यकीय मदतीसाठी २६ रुग्णवाहिका
विसर्जन मिरवणुकीत आजारी व्यक्तींना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी म्हणून शहराच्या मध्य भागात २६ ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ०२०-२६१२२००० किंवा १०० या पोलीस नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र मेडिकल आत्पकालिन कक्षाच्या १०८ क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सेवेच्या अधिक माहितीसाठी डॉ. मनोज चव्हाण (७७७४०८१९६९), डॉ. राजेंद्र जगताप (९९२२३४३४६८), डॉ. प्रवीण साधले (८३८०००१३९३), पोलीस आरोग्य समन्वयक अमोल क्षीरसागर (९७६४५१९१९९) आणि पोलीस निरीक्षक एच. टी. कुंभार (९६५७१२१२७१) यांच्याशी संपर्क साधावा.
 कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपर्क क्रमांक
नागरिकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक सुरू केले आहेत. कायदा- सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अडचणी आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन केले आहे. गणपती विसर्जन मार्गावरील ठिकाण आणि क्रमांक पुढील प्रमाणे-  
बेलबाग चौक (०२०-२६२०८२७०), फरासखाना पोलीस ठाणे नियंत्रण कक्ष (२४४४६५७१), मंडई पोलीस चौकी (२६२०८४१६), विजय टॉकीज पोलीस तंबू (२६२०८४२९), शनिपार चौक पोलीस तंबू (२६२०८४२८), मुख्य नियंत्रण कक्ष ( ०२०-२६१२२८८०, २६१२६२९६, २६२०८२५०, २६२०८३६०), महिला हेल्पलाईन (१०९१), आपत्कालिन (२६१३२२४४, २६१३२२५५), एसएमएस बूथ (७७९८१००१००), मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त (०२०-२६२२०८२८३), वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त (२६२०८३४०), प्रशानासन विभाग सहायक पोलीस आयुक्त (२६१२८८५५, २६२०८२१०), विशेष शाखा सहायक पोलीस आयुक्त (२६१२३६६२).