गिरगावचा पाडवा आणि ‘ती’ हे जणू समीकरणच झालं आहे. बुलेटचा आवाज करत ‘ती’ आणि तिची ‘बिजली’ जेव्हा शोभा यात्रेमध्ये येतात तेव्हा अनेकांच्या माना आजही ती कोण हे पाहण्यासाठी आपसुक वळतात. ‘ती’ जेवढी नटून येते तेवढीच तिची ‘बिजली’ही ऐटीत असते. नक्की तिला बघायचं की बिजलीला असा प्रश्न उपस्थितांमध्ये असतो. ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून, डॉ. अपर्णा बांदोडकर आणि ‘बिजली’ म्हणजे त्यांची बुलेट.

आदिशक्ती पथकापासून शोभायात्रेला सुरुवात होते. यात महिला बुलेट, बाईक्स, स्कुटी घेऊन रॅली काढतात. या रॅलीचं प्रतिनिधित्व डॉ. अपर्णा करतात. शोभायात्रेत सहभागी होण्याचं अपर्णांचं हे पाचवं वर्ष.

mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!

सुरुवातीच्या दिवसांतला अनुभव सांगताना अपर्णा म्हणतात की, ‘२०१३ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा शोभायात्रेत सहभागी झाले होते तेव्हा बुलेट घेऊन चालवणारी मी एकटी होते. बाईक्स, स्कुटी, मोपेड सर्व काही पकडून आम्ही १० महिलाही नव्हतो. गर्दीही फार कमी होती. पण यावर्षी ही संख्या ५० च्याही वर जाण्याची शक्यता आहे. आदिशक्ती रॅली ही एक प्रोत्साहनात्मक रॅली आहे. नववर्षाच्या निमित्ताने महिला सिमोल्लंघन करुन बाईक्स शिकतात, त्या नवीन गोष्टी आत्मसात करायला पुढे सरसावत आहेत. भावाची, मित्राची, वडिलांची मोटारसायकल घेऊन त्या येत असतील पण अशा शोभायात्रांमध्ये सहभागी होणं हे ही फार महत्त्वपूर्ण आहे. कदाचित पुढच्या शोभायात्रेला त्यांच्याकडे स्वतःची बाईक असेलही. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणारी ही एक पायरी आहे, असं मला वाटतं. शोभायात्रेमध्ये मुलींचा उत्साह पाहण्यासारखा असतो. अगदी टिळकनगर, वसई इथूनही महिला या बाईक रॅलीसाठी आपल्या बाईक घेऊन येतात.’

ज्या वेळी अपर्णाने त्यांची बुलेट बुक केली होती, तेव्हा त्यांनी वर्तमानपत्रात गुढी पाडव्याच्या बाईक रॅलीचे फोटो पाहिले होते. पुढच्या वर्षी या रॅलीमध्ये सहभागी होण्याचा निश्चय त्यांनी मनोमन केला होता. आपला स्वप्नांचा मागोवा घेत त्यांनी मैत्रिणीच्या ओळखीने संपदा यांच्याशी ओळख केली. संपदा अनेक वर्षांपासून आदिशक्ती रॅलीचं प्रतिनिधित्व करत आहेत. २०१३ मध्ये शोभायात्रेत अपर्णाशिवाय दुसरं कोणीच बुलेट चालवणारं नव्हतं. साहजिकच सगळ्यांच्या नजरा तेव्हा त्यांच्यावरच खिळल्या होत्या. एक अनुभव म्हणून यात्रेमध्ये सहभागी झालेल्या अपर्णांच्या आयुष्याचा आता शोभायात्रा हा एक भागच झाला आहे.

नऊवारी साडी, चंद्रकोर, नथ, उजव्या हातावर असणाऱ्या टॅटूवरच बांधलेला बाजूबंद, दबंग स्टाईलचा गॉगल अशा अविर्भावात अपर्णा दिसली की आजही नजरा तिच्यावरुन हटत नाहीत. व्यवसायानं डेंटिस्ट असणाऱ्या अपर्णा शोभायात्रेच्या निमित्तानं वृत्तपत्र, वृत्तवाहिनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या. शोभायात्रेला ज्या रंगाची साडी त्या नेसणार असतील त्याच रंगाच्या फुलांच्या कॉम्बिनेशनने त्या आपल्या बुलेटला अर्थात बिजलीलाही सजवतात. शेवटी अपर्णाला पाहायला येणारे बिजलीलाही तेवढ्याच उत्सुकतेने पाहत असतात ना..

आतापर्यंत अपर्णा यांनी त्यांच्या बुलेटवरुन अर्धा भारत पायदळी तुडवला आहे. राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल अशा अनेक ठिकाणी अपर्णा आणि त्यांची बिजली जाऊन आली आहे. घर आणि क्लिनिक एवढ्या पुरताच मर्यादित न राहता अपर्णाने त्यांच्या बिजलीसह भारत भ्रमंतीला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबानेही त्यांना तेवढीच साथ दिली.

डझनभर बांगड्या घातलेले हात स्वयंपाक घरात जेवढ्या चपळाई चालतात तेवढेच ते बाईक्सचे अॅक्सिलेटर फिरवतानाही शिताफीने चालतात हेच अपर्णाने त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं.

aparna-2

aparna-3

aparna-5 aparna-6 aparna-7

aparna

-मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com

छाया सौजन्यः अपर्णा बांदोडकर फेसबुक