फॅट बर्न
तुम्ही वजन कमी करण्यासाठी काय करू या विचारात असाल तर हे अॅप तुमच्या उपयोगी पडू शकते. या अॅपमध्ये शरीरातील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी विविध उपाय सुचविण्यात आले आहे. याचबरोबर अॅपमध्ये विचारलेला तुमचा तपशील तुम्ही दिला की अॅपमध्ये बॉडि मास इंडेक्सपासून इतर उपयोगी माहिती समोर येते. या माहितीच्या आधारे तुम्हाला काही व्यायाम सुचविले जातात. तसेच आहारही सुचविला जातो. इतकेच नव्हे तर तुम्ही कोणता व्यायाम केल्यावर शरीरातील कोणत्या भागावर काय परीणाम होतो याचा तपशील या अॅपमध्ये अॅनिमेशनच्या साह्याने दिसतो.