बाळ जन्मल्यावर होणारा आनंद कितीही अमूल्य असला तरी नवजात बालक घरी आले की त्याच्या रडण्याने संपूर्ण घर अस्वस्थ होते. बाळ रडले की नेमके काय करायचे याचा गोंधळ सुरू होतो. भूक, झोप, अस्वस्थता, काही दुखलं की बाळ रडायला सुरुवात करते. ते का रडतेय ते वेळीच आईच्या लक्षात आले नाही तर त्यानंतर बाळ टीपेचा सूर धरते. कोणत्याही देशात किंवा आíथक स्तरात जन्मलेले बालक मूलभूतरित्या पाच प्रकारचा आवाज काढून रडते. त्याच्या रडण्याचा ध्वनी समजून घेतला की त्याचे रडणे त्रासदायक वाटण्याऐवजी संवादाचे माध्यम ठरते.
माझा नातू तीन महिन्यांचा आहे, तो जन्मला तेव्हा लहान मुलांच्या रडण्याचा नेमका अर्थ शिकून घेण्याचा सल्ला मला बालरोगतज्ज्ञांनी दिला. जन्मल्यानंतर १५ दिवस खूपच गोंधळाचे असतात. बाळ रडलं की आपला गोंधळ उडतो. मी स्वत: डॉक्टर असल्याने लहान मुलांच्या रडण्याचा नेमका अर्थ शिकण्याचं महत्त्व मला पटलं आणि मी ते शिकायचं ठरवलं.
संशोधनानुसार बाळ साधारणत: पाच प्रकारचे आवाज काढून रडतं. शरीरातील विशिष्ट अवयवाच्या कार्यकारिणीवर हे आवाज अवलंबून असतात. बाळ भुकेलेलं असतं, तेव्हा ते ओठांचा चंबू करतं. जिभेचाही आकार खोलगट होतो आणि दूध पिण्यासाठी त्याच्या जबडय़ाची हालचाल सुरू होते. जेव्हा त्याची ही गरज पुरवली जात नाही तेव्हा ओठ, जीभ आणि जबडय़ाच्या याच हालचालीतून ते आवाज काढणे सुरू करते, तेव्हा त्याच्या रडण्याचा आवाज ने.ने.ने.. असा होतो.
दूध पिऊन झालं, की बाळाची स्तनावरची पकड कितीही घट्ट असली तरी त्याच्या शरीरात हवा जायला सुरुवात होते आणि त्यामुळेच ढेकर काढायला लावणं आवश्यक ठरतं. जर हे केलं नाही तर बाळ रडायला लागतं. यावेळी त्याला अन्नासोबत अन्ननलिकेत अडकलेली हवा छातीमधून वर तोंडावाटे बाहेर काढायची असते. छातीच्या हालचालीमुळे यावेळी आवाजाचा सूर बदलतो. मुलाने आह.. आह.. आह.. असे रडायला सुरुवात केली की त्याला वर उचलून ढेकर काढायला लावला पाहिजे.
बाळाने ओढलेली हवा आतडय़ांपर्यंत पोहोचली किंवा त्याचे पोट फुगले की ही हवा (गॅस) बाहेर काढण्यासाठी तो शरीर आक्रसून घेऊन रडायला सुरुवात करतो. यावेळी शरीरात छातीच्या खालच्या भागात हालचाली सुरू झाल्याने आवाजाचा पोत बदलतो. मूल र्आ घ, र्आ घ, र्आ घ.. असे रडू लागते. अनेकदा बाळ दिवसातून तीन तास, आठवडय़ातून तीन वेळा असे तीन महिने रडत असेल तेव्हा त्याला पोटाच्या तक्रारी असल्याचे सांगितले जाते. अशा वेळी मुलाच्या पोटाला हलकासा आधार देऊन मदत करायला हवी.
दुपटी, डायपर ओलं झाल्याने, थंडी वाजत असल्याने, उकाडा वाढल्याने बाळाला अस्वस्थ वाटत असेल, तेव्हा तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो साध्या आणि हळूवार आवाजात रडतं. ए.ए.ए असा आवाज सुरू झाला की त्याकडे लक्ष द्या.
मूल झोपेला आलं असेल तर डोळे चोळण्याव्यतिरिक्त ते जांभयाही देतं. ते रडायला सुरुवात करण्यापूर्वी त्याला झोपायला द्या.
ते रडताना त्याला जांभयाही येत असतील
तर त्याच्या रडण्याचा आवाज आऊ.आऊ.आऊ.. असा होतो.
बाळाने रडायला सुरुवात केल्यावर तीन ते पाच मिनिटात त्याचा अर्थ ओळखून कृती केली की बाळ रडायचे थांबते. मात्र त्याची समस्या कायम राहिली की नराश्य, राग यामुळे ते आकांत करतं आणि मग त्याला सावरणं कठीण होऊन जातं. बाळांच्या रडण्याचा हा अर्थ सर्वप्रथम डन्स्टन नावाच्या महिलेने शोधून काढला. यामुळे लाखमोलाचा फायदा झालेले जगभरातील आई-बाबा आता या आवाजांना डन्स्टन बेबी क्राइज म्हणून ओळखतात. जग किंवा आíथक स्तर कोणताही असला तरी या मूलभूत रडण्यामध्ये कोणताही फरक पडत नाही. एकदा आईवडिलांना या रडण्याचा अर्थ समजला की पालकत्व सोपे होते आणि बाळाचे रडणे त्रासदायक न वाटता मजेशीर बनते. याचीच दुसरी बाजू म्हणजे मूल दोन महिन्यांचे होईपर्यंत तुम्हाला त्याच्या
रडण्याचा आवाज ओळखू आला नाही
तर मात्र तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी मूल वेगवेगळे आवाज काढते आणि
त्याने तुमचा गोंधळ वाढतो.
रेखा भातखंडे

ए.ए.ए..घे.घे.!
hlt05माझा वैयक्तिक अनुभवही मजेशीर आहे. माझ्या नातवाने प्रत्येकवेळी नॅपी ओले झाल्यावर ए. ए.. अशी रडायला सुरुवात केली की मी माझ्या मुलीला हाक मारून घे.. घे.. म्हणत असते. त्यावेळी ती नातवाला उचलून नॅपी बदलत असे. बाळ दोन महिन्याचे झाले तेव्हा त्याने हा आवाज ओळखून नॅपी ओली झाल्यावर ए. ए..ए. ऐवजी घे, घे.. असा आवाज काढायला सुरुवात केली. आम्हाला या आवाजाची सवय झाली, मात्र बाहेरून भेटायला येणाऱ्यांचा गोंधळ उडतो. मूल घे. घे. म्हणत असताना त्याची आई दूर का जाते (नॅपी आणायला) असा त्यांना प्रश्न पडतो. सांगायचा मुद्दा असा की, लहान मुलं तुम्ही सतत काय बोलता ते लक्षपूर्वक ऐकत असतात. जन्मल्यापासून किंवा अगदी गर्भात असल्यापासून त्याचे तुमच्यावर लक्ष असते. तुम्ही सतत एक आवाज काढत राहिलात तर बाळ तो आवाज काढण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही बोलताना त्याचे तुमच्या चेहऱ्याकडेही लक्ष असते. सुरुवातीला बाळाला केवळ आठ ते दहा इंचापर्यंतचे दिसते, त्यानंतर हळूहळू त्याला पुढचे दिसू लागते आणि तो तुमचा चेहरा ओळखायला लागतो. त्यामुळे बाळाशी बोलताना तुमचा चेहरा त्याच्या जवळ न्या आणि चेहऱ्यावर कायम हसू असू द्या. तुमच्या चेहऱ्यावरील भावनांचा बाळावर प्रभाव पडतो. तेव्हा तुम्ही हसलात की बाळ बसेल आणि तुमच्यासाठी व कुटुंबीयांसाठी हे दिवस आनंददायी होतील..

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप