असे का होते?
आयुर्वेद चिकित्सेनुसार, हिवाळ्यातील थंड हवामानात शरीरात कफ साठतो. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ होत जाते. त्यामुळे तो वितळतो आणि सर्दी होते. त्यातच उकाडा वाढत असल्याने थंड पदार्थ खाण्यात आलेकी सर्दीत भरच पडते.
उपाय काय?
आले व तुळशीचा लहान चमचाभर रस आणि काळे मिरे पावडर चिमुटभर घेऊन हे मधात खलावे. त्याचे चाटण दिवसातून तीन-चार वेळा घ्यावे.
सुंठ, गवती चहा, दालचिनी, जेष्ठमध यांचा काढा सकाळ-सायंकाळ घ्यावा. कपाळावर सुंटीचा लेप लावावा किंवा वेखंडाची धुरी घ्यावी.
यामुळे काय होते?
शरीरातील अतिरिक्त कफ निघून जातो आणि सर्दी कमी होते. पचनशक्ती सुधारते.
इतर काळजी काय घ्यावी?
कोमट पाणी प्यावे. थंड पदार्थ, दही, केळी, काकडी खाऊ नये. माफक व्यायाम करावा.