‘फिटनेस अॅप’ची तशी अॅप बाजारात कमी नाही. त्यालाच भरीस भर म्हणून की काय पण गुगलने नुकतेच ‘गुगल फिट’ हे हेल्थ अॅप बाजारात आणले आहे. पूर्णपणे मोफत असेलेले हे अॅप आपल्या आपल्या आरोग्यावर संपूर्ण नजर ठेवून असते. दिवसभरात तुम्ही किती पायऱ्या चढल्या, किती वेळा धावालात, किती वेळ सायकलिंग केले याची इत्यंभूत माहिती यामध्ये तुम्हाला दिवसाअखेर मिळू शकते. या अॅपमध्ये तुम्ही दिवसाला किती कॅलरीज बर्न करायच्या आहेत याचे उद्दीष्टही ठरवू शकता. त्या उद्दीष्टापर्यंत तुम्ही पोचलात की नाहीत याचा तपशीलही हे अॅप तुम्हाला वारंवार देत असते. अँड्रॉइडच्या ४.० हे व्हर्जन असलेल्या कोणत्याही फोनवर हे अॅप काम करू शकते. काही फोन्समध्ये सध्या अशाप्रकारचे अॅप्स इनबिल्ट दिले जातात, तर काही जण यासाठी वेगळे मनगटी उपकरण विकत घेतात. या सर्वाला पर्याय म्हणून हे अॅप केव्हाही आपल्याला उपयुक्त ठरू शकते.