‘‘नगरी नगरस्य एव रथस्य एव रथी यथा ।
स्वशरीरस्य मेधावी कृत्येषु अवहितो भवेत् ।।’’
चरकाचाऱ्यांनी  या  सूत्रात  बुद्धिमान व्यक्तीने स्वत:च्या शरीराचे रक्षण कसे करावे याचे मार्गदर्शन समर्पक उदाहरणे देऊन केले आहे.  नगरपाल ज्याप्रमाणे अंतर्गत शत्रूंपासून नागरिकांचे रक्षण करतो, सारथी ज्याप्रमाणे बाह्य गोष्टींपासून रथाचे रक्षण करतो त्याप्रमाणे मनुष्याने  शरीराबाहेरच्या  व  शरीरातील  दूषक  गोष्टींपासून शरीराचे रक्षण करावे. याच सूत्राचा प्रत्यंतर  आम्हाला हॉजकिंग्स  लिंफोमाचे  निदान  झालेल्या  २५  वर्षांच्या सुजयच्या केसमध्ये आला.  घरी आत्या  व  काकांना कॅन्सर असल्याची आनुवंशिकता असलेल्या सुजयचा स्वत:चा हॉटेलचा  व्यवसाय  असल्याने खाणे-पिणे-झोप या सगळ्यातीलच अनियमितता व चुकीच्या सवयी त्याला  घातक  ठरल्या.  शीतपेय,  फ्रीजमधील  फळे व दूध, दही, वेफर्ससारखे तळलेले पदार्थ, लोणचे,  बेकरीचे  पदार्थ, चायनीज फूड, शिकरण, शिळे पदार्थ यांचा आहारात अधिक प्रमाणात व वारंवार  वापर,  रात्री  उशिरापर्यंत न झोपण्याची सवय व या जोडीला भित्रा, अंतर्मुख व काळजी करण्याचा  स्वभाव  या  सगळ्याचा परिपाक म्हणजे सुजयला २००० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी हॉजकिंग्स  िलफोमाचे  निदान  झाले.  केमोथेरॅपी,  रेडिओथेरॅपी व बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यावर त्याने  व्याधिप्रतिबंधासाठी  आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक औषधे सुरू केली व आजपर्यंत कॅन्सरला डोके वर काढू दिले नाही.
आपल्या  शरीरात  रक्तात  प्रामुख्याने पांढऱ्या पेशी (डब्ल्यू.बी.सी. किंवा िलफोसाइट्स), तांबडय़ा पेशी (आर.बी.सी.) व प्लेटलेट्स या पेशी असतात. यापकी बॅक्टेरिया (जिवाणू), व्हायरस (विषाणू) या  जंतुसंसर्गापासून  शरीराचे  रक्षण करण्याचे, शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युन सिस्टिम मजबूत  ठेवण्याचे कार्य पांढऱ्या पेशी किंवा िलफोसाइट्स करतात. िलफोसाइट्स्चे बी व टी िलफोसाईट्स  असे  दोन  प्रकार असून टी िलफोसाइट्स  जिवाणू  विषाणू यांचा सरळसोटपणे नायनाट करतात तर बी िलफोसाइट्स  प्लाझमा सेल्सद्वारे अँटिबॉडीज निर्माण करून त्यांच्याकरवी जिवाणू व विषाणूंचा नाश करतात. बहुतांशी सर्व प्रकारच्या हॉजकिंग्स िलफोमाची निर्मिती बी िलफोसाइट्समधून होते. हॉजकिंग्स िलफोमाच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या या विकृत बी िलफोसाइट्स  ज्या  दोन शास्त्रज्ञांनी त्यांचा शोध लावला त्यांच्या नावे रिड-स्टर्नबर्गस् सेल्स म्हणतात.  या  पेशी आकाराने प्राकृत िलफोसाइट्सपेक्षा मोठय़ा असतात. िलफोसाइट्स या पेशी आपल्या शरीराच्या िलफॅटिक सिस्टिमचा म्हणजेच व्याधीप्रतिकारशक्तीचा एक भाग असून त्यात िलफनोड्स  (लसिका ग्रंथी), िलफ  (रसधातू) व िलफ व्हेसल्स (लसिकावाही नलिका) यांचाही समावेश  होतो.  त्यामुळे  हॉजकिंग्स िलफोमामध्ये शरीरातील मन्या (मान), कक्षा (काख), जंघा (जांघ) या  स्थानातील  तसेच  उदरपोकळीतील लसिका ग्रंथी आकाराने मोठय़ा होतात, परंतु तेथे वेदना  नसते, त्यासह  भूक  मंदावणे,  ताप  येणे, वजन कमी होणे, थकवा, त्वचेस खाज सुटणे, खोकला, दम लागणे, रात्री घाम येणे ही लक्षणेही दिसतात.
आशिया  खंडातील  लोकांपेक्षा युरोप व अमेरिकेमध्ये या कॅन्सरचे प्रमाण अधिक असून सामान्यत: पुरुषांत १५ ते ४० वयोगटात किंवा पन्नाशीनंतर हॉजकिंग्ज िलफोमा अधिक्याने आढळतो. मोनोन्युक्लिओसिस इन्फेक्शन, एच.आय.व्ही.  एड्स बाधिक रुग्ण, अवयव प्रत्यारोपण शस्त्रकर्म झालेले रुग्ण,  स्थूल व्यक्ती,  तंबाखू  खाण्याची  सवय  असलेल्या व्यक्ती यांच्यात हॉजकिंग्स िलफोमा होण्याचे प्रमाण अधिक आढळते. रुग्णाचे प्रत्यक्ष परीक्षण, बायॉप्सी, बोन मॅरो ऑस्पिरेशन बायॉप्सी, इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री, एक्स-रे, सोनोग्राफी, सी.टी.स्कॅन, पेट स्कॅन, रक्ततपासणी यांच्या सहाय्याने  हॉजकिंग्स  िलफोमाचे  निदान  निश्चित केले जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार हॉजकिंग्स िलफोमामध्ये केमोथेरॅपी, इम्युनोथेरॅपी, रेडिओथेरॅपी व बोन मॅरो ट्रान्सप्लांट या चिकित्सापद्धतींचा अवलंब केला जातो. आयुर्वेदानुसार  या  प्रकारच्या  कॅन्सरमध्ये  रसधातू,  रसधात्वग्नि,  जाठराग्नि  या  शरीर  घटकांची  विकृती  व  त्यास  हेतुभूत  कफवर्धक,  शरीरात  स्राव  निर्माण  करणारा  दह्यासारखा अभिष्यंदी,  अग्निदुष्टीकर  आहार-विहार-मानसभाव  व  कृमी  या  घटकांचा  विचार  अनिवार्य! रसधातुगत  ज्वर,  सान्निपातिक  ज्वर,  कफज  पांडु,  कफज  कृमी  या  आयुर्वेदोक्त व्याधांशी हॉजकिंग्ज  िलफोमाचे  साधम्र्य  आढळते.  यात  कामदुधा,  प्रवाळ,  आरोग्यवíधनी,  त्रिफळा गुग्गुळ,  सुवर्णभस्म,  सुवर्ण मालिनी वसंत यासारख्या शमन व रसायन औषधांसह वमन, विरेचन, कृमिघ्न  व  लेखन  बस्ति या पंचकर्म चिकित्सेमुळे जाठराग्नि दीपन, रसधातूची शुद्धी, धात्विग्नचे दीपन,  क्लेद  व  कृमींचा  नाश  होतो व हॉजकिंग्स िलफोमाची लक्षणे व पुनरुद्भव यावर नियंत्रण मिळविता  येते.  याशिवाय  नियमित  शरीरास  सोसवेल  इतका  चालणे-फिरणे-पोहणे-योगासने असा  व्यायाम,  नियंत्रित व नियमित आहार, मानसिक शुचिता यांची साथ मिळाली तर चिकित्सा अधिकच  फलदायी  ठरते.

Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…