*  पन्नाशीच्या सौ. मंगलाताईंना उजव्या बाजूला ओटीपोटात अचानक दुखू लागले, भूक मंदावली व वजन कमी होऊ लागले. त्यांच्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीमध्ये स्त्रीबीजांडाच्या कॅन्सरची संभावना वाटली म्हणून लगेचच त्यांचे गर्भाशय निर्हरण शस्त्रकर्म केले. प्रयोगशाळेत गर्भाशय व बीजांडाचे परीक्षण केल्यावर स्त्रीबीजांडाच्या तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सरचे निदान निश्चित झाले. त्यामुळे कॅन्सरतज्ज्ञांनी त्यांना केमोथेरॅपी घेण्याचा सल्ला दिला. अचानक झालेले कॅन्सरचे निदान, गर्भाशयाचे शस्त्रकर्म व त्यापाठोपाठ केमोथेरॅपी घेण्याचा वैद्यकीय सल्ला अशा एकापाठोपाठ एक घडलेल्या अकल्पित गोष्टींमुळे मंगलाताई व त्यांचे नातेवाईक चांगलेच भांबावून गेले होते. त्याच वेळी त्यांना एका कॅन्सर रुग्णाकडून आमच्या वाघोलीच्या कॅन्सर संशोधन केंद्राची माहिती समजली. सौ. मंगलाताई आमच्या रुग्णालयात आल्या त्याच मनात अनेक विचार घेऊन! केमोथेरॅपी घेण्याची मला खरेच आवश्यकता आहे का? केमोथेरॅपी घेतल्यास त्याच्या दुष्परिणामाने मला अंथरुणाला खिळून राहावे लागेल का? केमोथेरॅपी ऐवजी किंवा केमोथेरॅपीबरोबर आयुर्वेदिक उपचार घेता येतील का, या सर्व उपचारांनंतर माझे आयुष्य कसे असेल? असे नाना प्रश्न त्यांच्या मनात घोळत होते. सौ. मंगलाताईंच्या मनातील विचारांचा कल्लोळ आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरूनच ओळखला व आमच्याच कॅन्सर संशोधन प्रकल्पात केमोथेरॅपीबरोबर व त्यानंतरही सहा वर्षे आयुर्वेदिक चिकित्सा घेत असलेल्या सौ. उषाताईंची त्यांच्याशी भेट घालून दिली व सौ. उषाताईंना आपल्या सुदृढ आरोग्याचे रहस्य सांगण्यास सांगितले. सौ. उषाताईंनीही स्त्रीबीजांडाच्या कॅन्सरचे निदान झाल्यावर केमोथेरॅपीबरोबरच आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक औषधे नियमितपणे घेण्यास सुरुवात केली. औषधांबरोबरच केमोथेरॅपीच्या काळात आम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्याचेही काटेकोर पालन केले. यामुळे उषाताईंना केमोथेरॅपीचे अगदी कमी दुष्परिणाम जाणवले व अपेक्षित काळात त्या केमोथेरॅपी पूर्ण करू शकल्या. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व पर्यायाने कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी गेली आठ वर्षे सौ. उषाताई नियमितपणे आयुर्वेदिक औषधे, पंचकर्मातील बस्ति उपक्रम व पथ्यपालन करीत आहेत. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या साहाय्याने कॅन्सरला धर्याने तोंड देणाऱ्या सौ. उषाताईंचे मूíतमंत उदाहरण पाहून सौ. मंगलाताईंनीही केमोथेरॅपीबरोबर आयुर्वेदिक औषधे घेण्याचा रास्त निर्णय घेतला. यामुळे त्यांना उलटय़ा, मळमळ, पोटदुखी, भूक मंदावणे, अतिसार, अशक्तपणा, वजन घटणे, रक्तातील हिमोग्लोबिनचे व पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होणे या केमोथेरॅपीच्या काळात प्रकर्षांने दिसणाऱ्या लक्षणांची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी झाली.
ल्ल आंतरराष्ट्रीय व्यवसायात जम बसलेल्या जाधवकाकांना गालाच्या आतल्या त्वचेत बरेच दिवस न भरून आलेली जखम झाली. त्याची तपासणी केली असता कॅन्सरचे निदान झाले. आता रेडिओथेरॅपी घेणे क्रमप्राप्तच होते. पाच आठवडय़ांची रेडिओथेरॅपी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दुष्परिणामांची तीव्रता त्यांना इतकी जाणवली की संपूर्ण तोंडास आतून झायलोकेन जेली लावल्याशिवाय त्यांना पाण्याचा घोटही घेता येत नव्हता. त्याच वेळी त्यांना आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पाची माहिती समजली व त्यांनी आयुर्वेदिकउपचार सुरू केले. आश्चर्य म्हणजे एक आठवडय़ातच जाधवकाका झायलोकेन जेलीशिवाय घरचे जेवण जेऊ लागले. पर्यायाने रेडिओथेरॅपीच्या काळात आलेला अशक्तपणा, घटलेले वजन या सगळ्यात महिन्याभरातच चांगली सुधारणा झाली. गेली चार वर्षे जाधवकाका नव्या जोमाने आपला व्यवसाय करीत आहेत.
अशा अनेक उदाहरणांवरून केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता आयुर्वेदिक उपचार पद्धतींच्या साहाय्याने निश्चितच कमी होते, असे दिसून आले आहे.
कॅन्सरसाठी सध्या आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, केमोथेरॅपी, रेडियेशन व इम्युनोथेरॅपी या प्रचलित चिकित्सा पद्धती आहेत. शस्त्रकर्माने शरीरातील कॅन्सरग्रस्त भाग पूर्णत: किंवा बऱ्याचशा प्रमाणात काढून टाकला जातो. प्रामुख्याने शिरेवाटे व मुखावाटे दिल्या जाणाऱ्या केमोथेरॅपीमुळे कॅन्सरच्या पेशींचा नाश केला जातो. आयोनायिझग रेडिएशनच्या साहाय्याने कॅन्सर पेशींचा नाश करणे किंवा त्यांची वाढ आटोक्यात ठेवणे शक्य होते. इम्युनोथेरॅपीमधील औषधे शरीराची कॅन्सरविरोधी प्रतिकारशक्ती बळकट करतात. मात्र केमोथेरॅपी व रेडिएशन या चिकित्सा पद्धती जसे कॅन्सरच्या पेशींचा नाश करतात, तसेच सुदृढ पेशींचीही हानी करतात. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीचे दुष्परिणामही अनेकदा जाणवतात. रेडिएशनमुळे काही रुग्णांत त्या स्थानी दाह होणे, तेथील त्वचा लाल रंगाची होणे, त्वचेवर फोड येणे, उष्ण स्पर्श, ताप येणे, अशक्तपणा, भूक मंदावणे अशी लक्षणे निर्माण होतात. केमोथेरॅपीमुळे बऱ्याचशा रुग्णांत भूक मंदावणे, मळमळ, उलटय़ा, जुलाब, ताप, केस गळणे, सर्वागाची आग होणे, ताप येणे, अशक्तपणा, मलविबंध अशी लक्षणे निर्माण होतात. रक्तातील ऌीेॠ’्रुल्ल, हइउ ू४ल्ल३२, ढ’ं३ी’ी३२ कमी होतात. या लक्षणांच्या भीतीनेच अनेक रुग्ण केमोथेरॅपी व रेडिएशन टाळण्याचा प्रयत्न करीत असतात व यास पर्याय म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा घ्यावी का, असा विचार करू लागतात. परंतु आजपर्यंत कोणत्याही वैद्यकशास्त्रात कॅन्सरसाठी कायमस्वरूपी पूर्ण चिकित्सा उपलब्ध नसल्याने पर्यायी चिकित्सा म्हणून आयुर्वेदीय चिकित्सा घेण्याऐवजी केमोथेरॅपी किंवा रेडिएशनसह उष्णतेचे, पित्ताचे व विषाक्ततेचे शमन करणारी, पित्तशमन करणारी आयुर्वेदिक औषधे, विशिष्ट आहार-विहार, मानसिक संतुलन यांचा अवलंब केल्यास त्यामुळे निर्माण होणारी उलटय़ा,मळमळ, ताप येणे, सर्वाग उष्ण होणे ही लक्षणे कमी होतात. रुग्ण त्या उपचार पद्धतींस उत्तम प्रतिसाद देऊ शकतात व केमोथेरॅपी व रेडिओथेरॅपी अपेक्षित कालमर्यादेत पूर्ण करू शकतात, असे लक्षात आले आहे.
यापुढील लेखात आपण रेडीएशन व केमोथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी व्हावी म्हणून आयुर्वेदिक चिकित्सा कशी केली जाते याचा विचार करू.   

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!