कर्करोगास कारण ठरणारे शरीरातील द्रव बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिकांनी एक पंप तयार केला असून त्याचे शरीरात प्रत्यारोपण करता येते. ब्रिटनमधील एका ६२ वर्षांच्या महिलेला अंडाशयचा कर्करोग आहे. तिच्या शरीरात हा पंप प्रथमच बसवण्यात आला आहे. हॅमरस्मिथ रुग्णालयात शस्त्रक्रिया करून तिच्या त्वचेखाली तो बसवण्यात आला आहे. अ‍ॅससाइट्स नावाचे द्रव कर्करोगकारक पेशीतून स्रवत असतात. ते शरीरात साठत जाऊन आरोग्य बिघडते. कर्करोग रुग्णांना हे द्रव शरीराबाहेर काढण्यासाठी नेहमीच रुग्णालयात जावे लागते. नवीन पंपामुळे हे द्रव पोट व पित्ताशयातून बाहेर काढून लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाणार आहेत. ज्या महिलेला हा पंप बसवण्यात आला होता, तिच्या शरीरात दर तीन आठवडय़ाला असा पाच लिटर द्रव तयार होत असे. अंडाशयाचा कर्करोग असलेल्या दर तीन स्त्रियांपैकी एकीमध्ये असाइट्स नावाचा हा द्रव तयार होतो. स्वादुिपड, गर्भाशय, स्तन व पोटाच्या कर्करोगात अशा प्रकारे द्रव तयार होत असतात. ज्या पंपाच्या मदतीने आता हे द्रव बाहेर काढणे श?य झाले आहे त्याचे नाव अल्फापंप असे असून त्याच्या मदतीने अंडाशयाचा कर्करोग असलेल्या महिलांवरील उपचारांमुळे होत असलेला फरकही डॉ?टरांना कळणार आहे. असाइट्स या द्रवात कर्करोगाच्या पेशी असतात, त्यामुळे त्या लघवीवाटे बाहेर पडल्यानंतर त्यांची तपासणी करून कर्करोगाला कितपत प्रतिबंध होत आहे हे समजू शकेल, त्यासाठी बायॉप्सी करण्याची गरज भासणार नाही. या पंपाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून तो व्यावसायिक पातळीवर लगेच उपलब्ध केला जाणार नाही. त्यामुळे कर्करोगावरील उपचारात बराच फरक पडणार आहे. अंडाशय कर्करोग संशोधन केंद्राचे प्रा. हॅनी गाब्रा हे या पंपाच्या चाचण्यांचे नेतृत्व करीत असून त्यांनी सांगितले, की अनेक कर्करोगांमध्ये असाइट्सची निर्मिती होत असते. हा पंप आयपॉडपेक्षा लहान असून तो त्वचेखाली बसवला जातो व त्वचेत त्याचे आपोआप चार्जिगही होते.