सी. रामचंद्रन्ना जानेवारी २००८ मध्ये अचानक उभे राहण्यास त्रास, कंबर- पाठदुखी  होऊ  लागली.  दुखणे  घरगुती उपायांनी आटोक्यात न येता दिवसेंदिवस वाढू लागल्याने अस्थिरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने एम्. आर.  आय.  व  बोन  स्कॅन  केला  असता  पोटात  गाठी  व  बोन मॅरोमध्ये विकृती आढळली. बायोफ्सीने बोन मॅरोमध्ये पसरलेल्या हाय ग्रेड चौथ्या स्टेजमधील बी सेल नॉन हॉग्जकिंग्ज िलफोमाचे निदान झाल्याने सहा केमोथेरॅपी दिल्या. केमोथेरॅपीने कॅन्सर आटोक्यात  आला  असला  तरीही  त्याचा  पुनरुद्भव  होऊ नये म्हणून श्रीयुत रामचंद्रन्ना बोन मॅरो ट्रान्सफ्लान्टचा सल्ला दिला. मात्र आयुर्वेदावर गाढा विश्वास असल्यामुळे त्यांनी त्याऐवजी  आमच्या  प्रकल्पात  आयुर्वेदिक  चिकित्सा  सुरू  केली  व  पूर्वीच्या आहार  विहारातील  चुका  पूर्णपणे  टाळून  आपली  जीवनशैलीही  सुधारली. या साऱ्याचा परिपाक म्हणजे  गेली ६  वष्रे  त्यांनी  कॅन्सरला  काबूत  ठेवल्याचे  द्योतक  असलेले  पेट  स्कॅनचे रिपोर्टस्!  २००९ मध्ये  टी  सेल  नॉन  हॉजकिंग्स  िलफोमाचे  निदान  झालेल्या  एअरोनॉटिक्स  अभियंता असलेल्या २६ वर्षांच्या  अविनाशनेही  अशाच प्रकारे केमोथेरपी  व  रेडियोथेरपी  नंतर  आयुर्वेदिक  शमन  चिकित्सा,  दरवर्षी  पावसाळ्यात नियमित  पंचकर्मापंकी  बस्ति  चिकित्सा,  आहार  विहारातील नियमितपणा यांच्या सहाय्याने सुदृढ आरोग्य व करिअर यांचा उत्तम मेळ घातला आहे.
मागील  लेखात  आपण  हॉजकिंग्स  िलफोमाची  निर्मिती, कारणे, लक्षणे यांचा आढावा घेतला.  नॉन  हॉजकिंग्स  िलफोमा  (एन्. एच्. एल्.)  हा  कॅन्सरचा  प्रकारही  हॉजकिंग्स िलफोमाप्रमाणे  िलफोसाइटस्च्या  विकृतीमुळे  निर्माण  होतो.  मात्र  हॉजकिंग्स लिफोमापेक्षा  यात  विकृत िलफोसाइटसचे स्वरूप, प्रसर व चिकित्सा भिन्न असते. या प्रकारच्या  कॅन्सरचे बी सेल नॉन हॉजकिंग्स िलफोमा व टी सेल नॉन हॉजकिंग्स िलफोमा असे  दोन प्रमुख प्रकार असून त्या प्रत्येक प्रकारचे िलफोसाइटस्चे स्वरूप, कॅन्सर प्रथम निर्माण  होण्याचे  स्थान  यानुसार  उपप्रकारे आढळतात. यापकी बी सेल एन्. एच्. एल्चेप्रमाण  सर्वाधिक  म्हणजे ८५ टक्के असते. बी सेल िलफोमाचे डिफ्युज लार्ज बी सेल िलफोमा, फॉलेक्युलर िलफोमा, स्मॉल िलफोसायटिक िलफोमा, मंटल सेल िलफोमा, मार्जनिल झोन बी सेल िलफोमा, बíकट िलफोमा, प्रायमरी सी. एन्. एस् िलफोमा हे प्रकार असून  टी  सेल  िलफोमाचे  प्रिकर्सर  टी  िलफोब्लास्टिक   िलफोमा  व  पेरिफेरल  टी  सेल  िलफोमा,  एॅनाफ्लास्टिक लार्ज सेल िलफोमा व पेरिफेरल टी सेल िलफोमा हे  प्रमुख प्रकार  आहेत.  सामान्यत  कॅन्सरच्या  विकृत  िलफोसाइटस्ची  निर्मिती  लसिका  ग्रंथी  (िलफ नोडस्) मध्ये  होत  असली  तरी  वर  वर्णन  केलेल्या  प्रकारांपकी  काहींमध्ये  यांची निर्मिती  प्रथमत  बोन  मॅरो  ( अस्थिमज्जा) , फ्लीहा, थायमस ग्लॅण्ड, फुफ्फुस, मस्तिष्क, जठर, आतडी या अवयवांमध्येही  होते व त्या त्या अवयवानुसार एन्. एच्. एल्.ची लक्षणे दिसू  लागतात.  हॉजकिंग्स  िलफोमाच्या निदान पध्दतींप्रमाणेच आधुनिक वैद्यक शास्रानुसार  नॉन हॉजकिंग्स िलफोमाचे निदान निश्चित केले जाते. एन्. एच्. एल्ची सर्वसामान्य  लक्षणे  एच्.  एल्.  प्रमाणेच  िलफ नोडस्चा  आकार वाढणे, ताप येणे, वजन कमी होणे, रात्री प्रमाणाबाहेर घाम येणे, अशक्तपणा ही असतात. तसेच थायमस ग्लॅण्ड किंवा  फुफ्फुसात अर्बुद व्यक्त झाल्यास दम लागणे, चेहऱ्यावर व हातास सूज येणे; मस्तिष्कात  व  डोळ्यात  निर्माण  झाल्यास डोके दुखणे, फिटस् येणे; जठरात निर्माण झाल्यास पोट जड होणे, भूक मंदावणे; अस्थिमज्जेत निर्माण झाल्यास हाडे दुखणे ही लक्षणे व्यक्त होतात.
वयोगटाचा  विचार  करता  सामान्यत  ४५ ते ६० या वयोगटातील पुरुषांत याचे प्रमाण अधिक  असून प्रामुख्याने दुर्बल प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींत हा कॅन्सर होण्याची संभावना  अधिक असते. यात अवयव प्रत्यारोपण, एच्. आय. व्ही.  एडस्,  दीर्घकालीन एच  पायलोरी हिपॅटायसीस सी असा विशिष्ट विषाणू व जीवाणू संसर्ग, ऑटोइम्युन डिझीझ  या  अवस्थांचा समावेश होतो. तसेच रेडियेशनशी दीर्घकाळ संपर्क व दुसऱ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी पूर्वायुष्यात केमोथेरॅपी घेतली असल्यासही एन्. एच्. एल्. होण्याची शक्यता  अधिक असते. आयुर्वेदानुसार प्रामुख्याने विकृत कफाची निर्मिती करणारा, जाठराग्नी  मंद  करणारा व रस-रक्तधातूंची व अस्थिमज्जेची दुष्टी करणारा आहार व विहार या प्रकारच्या कॅन्सरला हेतुभूत ठरतो. एन्. एच्. एल्.च्या रुग्णांच्या जीवनशैलीचा अभ्यास करता पचण्यास जड असे मिठाईचे दुग्धजन्य गोड पदार्थ, दही, केळे, काकडी, व्हिनेगार    चिंचेसारखे  आंबट  पदार्थ,  मांसाहार,  मासे,  उडिदाचे  पदार्थ, मीठ, तळलेल पदार्थ,  स्निग्धाहार  यांचे  अधिक  प्रमाणात  व वारंवार सेवन; बठे काम, दिवसा जेवल्यावर  झोपण्याची  सवय,  अजिबात  चिंता न करणे, सुखासीन आयुष्य ही संभाव्य कारणे  आढळली.  
आधुनिक  वैद्यक शास्रात  यात  केमोथेरॅपी,  रेडियोथेरॅपी,  इम्युनोथेरॅपी  व  बोन  मॅरो ट्रान्सफ्लाण्ट  या  चिकित्सा  पद्धतींचा  अवलंब  केला  जातो.  मात्र  एन्.  एच्.  एल्.  मध्ये आधुनिक  चिकित्सेनंतरही  व्याधिप्रतिकारशक्ती  दुर्बल  होण्याची  शक्यता  अधिक असते.  त्यासाठी  आयुर्वेदोक्त  जाठराग्नी  व पचन  सुधारणारी  हिग्वष्टक चूर्ण, दाडिमाष्टक  ही  औषधे;  रस  व  रक्तधातूचे  अग्नि  सुधारणारी  आरोग्यवíधनी, नवायस लोहासारखी  औषधे;  कृमिकुठार,  आरग्वध  कपिला, खदिरारिष्ट ही कृमिघ्न व क्लेदनाशक  औषधे;   ग्रंथी  –  अर्बुदनाशक  त्रिफळा  गुग्गुळ,  कांचनार  गुग्गुळ  अशी औषधे;  अस्थिप्रसादक  प्रवाळ  भस्म  व  व्याधिप्रतिकारशक्ती बलवान करणारी सुवर्णभस्म,  गुडूची,  कुमारी  ही  रसायन  औषधे निश्चितच लाभदायक  ठरतात. शरीरातील  दुष्ट  दोषांचे  निर्हरण करून सुदृढ  पेशींची  निर्मिती  करण्यासाठी  वमन – विरेचन  – बस्ति-  रक्तमोक्षण  या पंचकर्म चिकित्सेचे योगदानही एन्. एच्. एल्.मध्ये महत्त्वपूर्ण ठरते. रुग्णाच्या बलाचा व प्रकृतीचा विचार करून दरवर्षी ऋतुसापेक्ष पंचकर्म केल्यास व्याधी अपुनर्भवास निश्चितच सहाय्य होते. आयुर्वेदीय चिकित्सेचा कणा असलेला अग्निदीपक,  पचण्यास  हलका, सुपाच्य, सर्व धातू पोषक असा आहार; आयुर्वेदोक्त दिनचर्या,  ऋतुचर्या,  आहारनियमांचे  पालन;  सोसवेल  इतका  नियमित व्यायाम; योगासने  व  मनशांती  यांची  जोड दिल्यास एन्. एच्. एल्.च्या रुग्णांची व्याधिप्रतिकारशक्ती सुधारण्यास  व  पर्यायाने  पुनरुद्भव  टाळण्यास  निश्चितच  मदत होते.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Chandrapur, Sudhir Mungantiwar, Pratibha Dhanorkar,
चंद्रपूर : राजकीय आखाड्यात, चौका-चौकात, कट्ट्यावर रंगू लागल्या ‘ताई’ आणि ‘भाऊ’च्या चर्चा; सट्टाबाजारात…
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?