लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांना श्वसनाचे अनेक विकार होतात. अनेक रुग्ण श्वसनविकारांसाठी वरचेवर डॉक्टरांकडे जात असतात, असे तपासात आढळून आले आहे. उँ१ल्ल्रू Chronic Obstructive Pulmonary Disease या नावाने ओळखला जाणारा श्वसनविकारातील महत्त्वाचा आजार आहे. हा विकार विशेषत: धूम्रपानामुळे होत असला तरी त्याची अनेक कारणे आहेत. उदा. प्रदूषण, स्वयंपाकखोलीत जेवण बनविताना होणारा धूर, वरचेवर होणारा विषाणू संसर्ग,औषधांनी आटोक्यात न राहणाऱ्या जीर्ण दमा यामुळेही हा विकार होऊ शकतो. हा आजार साधारणत: वयाच्या चाळिशीनंतर होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. काही दिवसांनी ते तिसऱ्या क्रमांकावर जाईल, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या निष्कर्षांत आढळले आहे.
सध्या चर्चेत असलेला श्वसनविकार म्हणजे Lung Fibrosis साधारणत: ७० टक्के लोकांना या आजाराचे कारण कळत नाही. बुरशीपासून झालेल्या lung allergy ने हा आजार होत असल्याचे सिद्ध झाले आहे. साठविलेल्या धान्यातील बुरशी, कबूतर किंवा इतर पक्ष्यांच्या विष्ठेत असणाऱ्या बुरशीमुळे, उसाच्या चिपा, लाकडाच्या भुशाने, काही कामांच्या ठिकाणी, बेकरीत, चीज मार्ट बनविणारे कारखाने, घरातील ओलावा, बांधकाम इत्यादीमुळे हा आजार होतो. या आजारात हृदयावर परिणाम होतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. दुर्दैवाने या दोन्ही आजारांना पूर्णत: बरे करणारे उपचार भारतात उपलब्ध नाहीत. हे रुग्ण सतत डॉक्टरांकडे जातात, प्रचंड पैसा खर्च करतात, दम लागत असल्यामुळे अनेकांना बिछान्यावरच आयुष्य काढावे लागते. या विकारामुळे
रुग्णाच्या हातापायाचे स्नायू तसेच श्वसनाचे स्नायू कमकुवत होण्यास सुरुवात होते. रुग्ण कोणतीही हालचाल करण्यापासून परावृत्त होतात. हा आजार बरा होत नसल्याने मानसिक वैफल्यही येऊ शकते.
अशा रुग्णांना आता आधार सापडला आहे तो Pulmonary Rehabilitation या उपचार पद्धतीचा. यात रुग्णांना शास्त्रीय उपचार दिले जातात. या उपचार पद्धतीचा रुग्णांना खूप फायदा होतो. या उपचार पद्धतीत नियोजनबद्ध व्यायाम करून घेतला जातो. रुग्णाची सध्याची आजाराची अवस्था बघून त्या रुग्णाच्या कोणत्या गरजा आहेत ते बघून रुग्णाच्या गरजेनुसार व्यायाम दिले जातात. हे व्यायाम काही आठवडे, आठवडय़ातून तीन दिवस, दिवसातून एक तास अशा प्रकारे दिले जातात. त्यानंतर हे व्यायाम घरी सुरू करण्यास सांगितले जाते. व्यायामासाठी आलेल्या रुग्णाच्या श्वसनाची, रक्तदाब, ऑक्सिजन पातळी आदींची तपासणी केली जाते. त्यानंतर त्याला व्यायाम दिला जातो. एक महिन्यानंतर फेरतपासणी केली जाते. श्वसनविकारतज्ज्ञ, फिजिओथेरॅपिस्ट, आहारतज्ज्ञ, समुपदेशक आदींच्या मदतीने ही उपचार पद्धती केली जाते. गोरेगाव पश्चिम येथील ‘प्रतिभा प्रभाकर पल्मोनरी रिहॅबिलिटेशन सेंटर’ येथे तीन वर्षांपासून ही सेवा कार्यरत आहे.
website: http://www.pulmonaryrehab.in