वयाच्या तिसऱ्या वर्षांआधीच आपण मुलगा आहे की मुलगी याची जाणीव होते. काही मुलांना त्यावेळेपासून आपल्या लिंगाबद्दल अढी वाटते. बहुतेक वेळेला ही बाब मुलांमध्ये घडते. त्याचा ठाम विश्वास असतो की तो मुलगा नाही, मुलगी आहे. मुलगा म्हणून वागवल्यावर त्याला राग येतो. त्याचे खेळ, वेष, वागणे, आवडीनिवडी सर्व मुलीसारखे असतात. काही मुलांना स्वतच्या लैंगिक अवयवाकडे पाहून किळस वाटते. मुलींप्रमाणे बसून ते लघवी करण्याचा प्रयत्न करतात. मुलाच्या वर्तणुकीवर घरच्यांकडून तीव्र प्रतिक्रिया होते. कधीकधी मुलावर शारीरिक, मानसिक दबाव आणि अत्याचार केले जातात. उपचार, पूजा, नवस केले जातात. सर्व कुटुंब त्रस्त होते. त्रास सहन होत नाही म्हणून मुलगा नमते घेऊन ही भावना मनात दडपून सामान्य जीवन जगण्याचा देखावा करतो. पण स्त्री असण्याचा विश्वास तसाच राहतो. मोठेपणी त्याची लैंगिक निवड समलंगिकतेकडे वळते. या प्रकाराला लैंगिक ओळख असे म्हणतात. ही स्थिती क्वचितच मुलींमध्ये आढळते. याचे नेमके कारण अजूनही कळलेले नाही. विशेष म्हणजे बालपणी हौस म्हणून मुलीचे कपडे घातले, मुलींचे खेळ दिले, काही बाबतीत दुर्लक्ष झाले किंवा गर्भावस्थेत विशिष्ट पदार्थ खाल्ले म्हणून असे घडत नाही. स्त्रीचे मन आणि पुरुषाचा देह किंवा पुरुषाचे मन आणि स्त्रीचा देह अशी ही परिस्थिती असते. यावर संशोधन केल्यानंतर समजले आहे कीमनाच्या ठेवणीला प्राधान्य देणे जास्त योग्य. शरीराच्या रचनेनुसार मन बदलण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला प्रचंड त्रास होतो आणि तसे घडतही नाही. मात्र मनाच्या स्थितीला मान देऊन शरीराची रचना बदलल्यावर संबंधित व्यक्ती समाधानी जीवन जगतात. त्यामुळे त्यांचे मन बदलण्याचा उपचार केला जात नाही. छोट्या मुलाच्या अशा वागण्याच्या तक्रारी आल्या की मानसिक तपासणीतून मुलाच्या मानसिकतेची खात्री केली जाते. खात्री पटल्यावर पालकांचे समुपदेशन करून त्याच्या मनातलेच लिंग मान्य करून त्याप्रमाणे त्याचे संगोपन करण्याचा सल्ला दिला जातो. पौगंडावस्थेपासून औषध, शस्त्रक्रिया करून लिंगबदलाची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

समलैंगिकता
पूर्वी समलैंगिकता ही विकृती किंवा आजारपण मानले जात असे. पण संशोधन आणि अनुभव या दोन्हीद्वारे हा चुकीचा समज असल्याचे सिद्ध झाले आहे. समलैंगिकता बहुतेक वेळेला पुरुषांमध्ये आणि क्वचित स्त्रियांमध्ये आढळते. व्यक्तीला खात्री असते की तो पुरुषच आहे. पुरुष असूनही त्याला इतर पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण वाटते. हे समलैंगिक आकर्षण वगळता त्यांचे आचार, विचार सर्वसामान्यांसारखेच असते. समलैंगिक जोडपी इतर जोडप्यांप्रमाणे व्यवस्थित संसार थाटू शकतात, मुलांचे चांगले संगोपन करू शकतात आणि सक्षम नागरिक बनू शकतात. पण भारतात समलैंगिक संभोगाला अनसíगक म्हणून बेकायदेशीर ठरवले आहे.
वैद्यकीयदृष्टय़ा समलैंगिकता ही माणसाच्या लंगिकतेचा एक प्रकार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये समलैंगिक भावना असतील तर त्याला आणि त्यांच्या कुटुंबियाला ते मान्य करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. काही व्यक्ती आपल्या समलंगिक मुलांचे जबरदस्तीने लग्न लावून देतात. अनेक व्यक्ती संकोच, भीती किंवा निव्वळ बेजबाबदार वृत्तीमुळे समलंगिक असतानाही लग्न करतात. असे लग्न करणे पूर्णत चुकीचे आहे कारण यात तीन व्यक्तींच्या आयुष्याचा खेळखंडोबा होतो. सध्या भारतात कायदा आणि सांस्कृतिक विचार समलैंगिकतेविरुद्ध आहेत, पण समलैंगिकता हा आजार नाही. त्यामुळे या व्यक्तींची मदत करणे मानसोपचार तज्ज्ञासाठी सुद्धा गुंतागुंतीचे आहे. पण त्यांचा त्रास कमी करण्यासाठी आणि त्यामुळे झालेल्या अतिनराश्यासारख्या मानसिक आजारासाठी उपचार मिळू शकतो. हमसफर किंवा आचलसारख्या सामाजिक संस्थांकडूनही अशा व्यक्तींना मार्गदर्शन घेता येते.
हे प्रश्न सर्व सामाजिक स्तर, धर्म, जाती, व्यवसाय, देशाच्या व्यक्तीमध्ये आढळलेले आहे. या स्थितीमुळे उत्पन्न झालेल्या मनस्तापाला मानसिक आजार समजले जाते, स्थितीला नाही. या व्यक्तींना समाज आणि वैद्यकीय तज्ज्ञांकडून समजून घेण्याची आणि पािठब्याची गरज असते. त्यांना नाही, आपल्याला बदलण्याची गरज आहे.
डॉ. वाणी कुल्हळी – vbkulhalli@gmail.com

Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
girl playing holi with boyfriend while standing on moving scooter
चालत्या स्कुटीवर उभे राहून तरुणाला रंग लावत होती तरुणी! अचानक ब्रेक दाबला अन्…. व्हिडीओमध्ये बघा पुढे काय घडले