केस हा स्त्रिया व पुरुष यांच्यासाठी सौंदर्याचा दागिना समजला जातो. टक्कल पडलेल्या पुरुषांना त्यांचे अकाली पडलेले टक्कल सतत त्रास देत असते. टक्कल पडण्याची आनुवंशिकताच असेल तर निराळी गोष्ट, पण इतर वेळी केसांची काळजी आहारातून घेणे आवश्यक असते. श्ॉम्पू व कंडिशनर्स लावतानासुद्धा तुमच्या केसांना ते कितपत योग्य आहेत हे डॉक्टरांकडून तपासून घेऊन मगच लावावेत. कारण प्रत्येकाच्या केसाची प्रत वेगळी असते.
आहाराच्या दृष्टीने सॅल्मन मासे, पालकाची भाजी, अंडी, ब्लूबेरी व रताळी केसांसाठी चांगली असतात. सॅल्मन माशात ‘ड’ जीवनसत्त्व असते ते केसांना मजबूत करते तर ओमेगा ३ मेदाम्लांमुळे केसांची वाढ चांगली होते. सार्डिन आणि ट्राउट मासे, अ‍ॅव्होकॅडो व लाल भोपळ्याच्या बिया यामुळेही फायदा होतो. आक्रोडातही ओमेगा-३ मेदाम्ले असतात. बायोटिन व ई जीवनसत्त्वही त्यात असते. त्यामुळे पेशींच्या डीएनएची हानी रोखली जाते. बायोटिनमुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. आक्रोडमध्ये तांबे असते त्यामुळे ते तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग कायम राखते. पालकाच्या भाजीत  लोह, बिटा कॅरोटिन, फोलेट, ‘क’ जीवनसत्त्व असते. त्यामुळे केसांची बळकटी वाढते. अंडी प्रथिने देतात याशिवाय त्यात जस्त, सेलेनियम, सल्फर, लोह हे घटक असतात त्यामुळे लोह केसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. पुरेसे लोह शरीरात नसेल तरी केस गळतात. ब्लूबेरीजमध्ये क जीवनसत्त्व असते त्यामुळे केसांच्या मुळांपर्यंत रक्तपुरवठा पोहोचण्यास मदत होते. क जीवनसत्त्वाअभावी केस तुटतात. किवी, टोमॅटो व स्ट्रॉबेरी ही फळे केसांसाठी चांगली आहेत. रताळी अ जीवनसत्त्व पुरवतात, शरीरात विशिष्ट प्रकारे अंतर्गत तेले तयार करतात. अ जीवनसत्त्व नसेल तर डोके खाजवण्याची इच्छा होते. डोक्यात कोंडा होतो. गाजर, आंबा, जर्दाळू, लाल भोपळा यांचे सेवनही केसांसाठी फायद्याचे ठरते.

प्रेमाच्या रसायनाचा मानसिक विकृतींवर उपयोग
प्रेमाचे रसायन म्हणून सर्वपरिचित असलेल्या ऑक्सिटोसिनचा वापर मानसिक विकृतींवरील उपचारांवर होऊ शकतो. स्वमग्नता (ऑटिझम) व स्किझोफ्रेनिया (छिन्नमानसिकता) या विकारांत त्याचा चांगला उपयोग होतो. वैज्ञानिकांच्या मते ऑक्सिटोसिन हे काही मानसिक विकारात उपयोगी ठरते. हे विकार सामाजिक कार्यप्रणालीशी संबंधित असतील तर त्याचा उपयोग होतो. ऑक्सिटोसिन हे न्यूरोपेप्टाइड असून ते स्त्रियांमध्ये प्रसववेदना तसेच बाळाला स्तनपान देताना मोठी भूमिका पार पाडत असते. ऑक्सिटोसिन हे सामाजिक वर्तनातही महत्वाचे ठरते, असे मॅसॅच्युसेटस् मेडिकल स्कूल चे डॉ.डेव्हीड काकरान यांचे मत आहे. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, ऑक्सिटोसिनचा संबंध हा सामाजिक निर्णय प्रक्रियेशी असतो. सामाजिक प्रेरणा, सामाजिक क्रियांमधील सहभाग व सामाजिक वर्तनातील स्मृती यांच्याशी त्याचा संबंध असतो. मानसिक रोगांशी ऑक्सिटोसिनचा संबंध असतो. ऑक्सिटोसिन हा सामाजिक आकलनाशी संबंधित मनोरोगांवर एक औषधी घटक ठरणार आहे. ऑक्सिटोसिनशी संबंधित प्रयोगात त्या व्यक्ती भावना ओळखण्यात अधिक सक्षम बनल्याचे दिसून आले. स्किझोफ्रेनियामध्ये मात्र त्याचे परिणाम वेगळे आहेत. ऑक्सिटोसिन हे ताणावर प्रतिसाद देत असते त्यामुळे ते नैराश्य आणि स्किझोफ्रेनिया यात उपयुक्त ठरू शकते. असे असले तरी ऑक्सिटोसिनचा
वापर प्रत्यक्ष मानसिक रोगांच्या औषधात केला जाण्यास वेळ लागेल असे सांगण्यात येते. ‘हार्वर्ड रिव्ह्य़ू ऑफ सायकिअ‍ॅट्री’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

वार्धक्य रोखण्यासाठी..
प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या आरडीएनए या जनुकावर वार्धक्याची प्रक्रिया अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. जपानमधील मिशिमा येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ जेनेटिक्सचे डॉ. ताकेहिको कोबायाशी यांनी केलेल्या संशोधनानुसार आरडीएनए जनुकांची स्थिरता वाढवली तर वार्धक्याच्या प्रक्रियेचा वेग मंदावतो. त्यांनी पावामध्ये वापरल्या जाणाऱ्या यीस्टच्या पेशींची आयुमर्यादा आरडीएनएला स्थिरता देऊन प्राप्त केली. मॅसे विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. ऑस्टेन गॅनले यांच्या मते वार्धक्याच्या प्रक्रियेत आरडीएनएची अस्थिरता हा मुद्दा महत्वाचा आहे. यीस्टमधील सर-२ जनुक वार्धक्याची प्रक्रिया रोखतो. सर २ जनुकाची क्रियाशीलता वाढवण्यास रेड वाइनमधील रेसव्हेरेट्रॉल हा घटक कारणीभूत असतो. असे असले तरी सस्तन प्राण्यांमध्ये त्यामुळे आयुमर्यादा  वाढल्याचे पुरावे नाहीत. यीस्टमध्ये सर २ जनुक हे आरडीएनएची स्थिरता निश्चित करते पण त्यात इतर घटकही भूमिका पार पाडतात. सर २ या जनुकाचा स्वतंत्रपणे या प्रक्रियेवर होणारा परिणाम तपासण्यात आला असता त्याचा वार्धक्याच्या प्रक्रियेशी संबंध दिसून आला. माणसात सर २ जनुकासारखे सिरटय़ुइन नावाचे सात जनुक असतात पण ते यीस्टमधील सर २ जनुकापेक्षा वेगळे वर्तन करतात. मात्र मानव व यीस्ट यांच्यातील आरडीएनए बरेचसे सारखे असतात त्यामुळे आरडीएनएची अस्थिरता हे वार्धक्य लवकर येण्याचे कारण असल्याचे मानले जाते. कोबायाशी यांनी पाच वर्षांंपूर्वीच आरडीएनएबाबत हा सिद्धांत मांडला होता पण तो पुराव्यानिशी सिद्ध झाला नव्हता. आरडीएनएला स्थिर करणारे घटक शोधून आयुमर्यादा वाढवता येऊ शकेल असा या संशोधनाचा अर्थ आहे. ‘करंट बायॉलॉजी’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.