समाजातील विभिन्न घटकांच्या हितासाठी, मदतीसाठी आणि उद्धारासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही ओळख. यातील काही संस्था जनसामान्यांच्या विविध स्वरूपाच्या हक्कांच्या जपणुकीसाठी झटत आहेत. आज अशाच आणखी काही संस्था

मुंबईतील गरिब लोकांसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी कार्यरत संस्था – सोसायटी फॉर दी प्रमोशन ऑफ एरिया रिसॉर्स सेंटर. हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३०९६७३०, ०२२ २३००५६११.

सद्य सरकार आणि समाजव्यवस्था याविषयी असलेल्या असंतोषासंदर्भात कार्य करणारी संस्था – अ‍ॅक्शन फॉर गुड गव्हर्नन्स अँड नेटवर्किंग इन इंडिया (अग्नि) – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २३६११३२७, ०२२ २३६८२६९७.

अनाथ बालकांच्या र्सवकष विकास आणि पुनर्वसनासाठी कार्यरत संस्था- वात्सल्य – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५७८२९५८, ०२२ २५७९४७९८.

मुंबईतील वेश्यावस्तीतील वेश्या आणि त्यांच्या मुलांच्या र्सवकष विकासासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी काम करणारी संस्था – प्रेरणा – ०२२ २३०५३१६६, ०२२ २५६९५९८६, ०२२ २५७००१२८.

मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील स्त्रिया व मुलांसाठी कार्य करणारी संस्था – स्नेहा – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६६१४४८८, ०२२ २६६०६२९५, ०२२ २४०४००४५ ( कार्यालयीन वेळ – सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत)

मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील गरजूंचे पुनर्वसन करण्यासाठी काम करणारी संस्था – स्लम रिहॅबिलिटेशन सोसायटी – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६४०८९११.

पर्यावरण संरक्षणासाठी काम करणारी संस्था – क्लीन मुंबई फाउंडेशन – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २२१५१८१०.

समाजातील दुर्बल घटकांमधील स्त्रियांच्या उत्थानासाठी कार्यरत संस्था – अन्नपूर्णा महिला मंडळ – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४३०४४७४, ०२२ २४३७३१८२.

पर्यावरण क्षेत्रातील संस्था – बाँबे एनव्हायर्नमेंटल अ‍ॅक्शन ग्रुप – हेल्पलाइन – ०२२ २२४२३१२६.

रस्ता सुरक्षाविषयक क्षेत्रात काम करणारी संस्था – वेल्फेअर ऑर्गनाझेशन फॉर रोड सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ अ‍ॅक्सिडेंटस् – हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २२८४४८४८.

शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी झटणारी संस्था – वसुंधरा – क्रमांक – ०२२ २६४३१०९०.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com