अपंग, विकलांग यांच्यासाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.

विमान प्रवास करणाऱ्या अपंग व विकलांग व्यक्तींसाठी ‘एअर इंडिया’तर्फे आवश्यक सेवा पुरवली जाते. त्यासाठी २४ तास सुरू असणाऱ्या विनामूल्य हेल्पलाइनचा क्रमांक आहे – १८०० १८० १४०७.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Disney pushing users towards paying for their own account and Stop password sharing From June
नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक

शिक्षण घेण्यात अडचण येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही संस्थांच्या हेल्पलाइन्स आहेत. त्यांची नावे आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक –

शिक्षण घेण्यात अडचण येणाऱ्या मुलांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘सायन हॉस्पिटल’च्या बालरुग्ण विभागाची हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक आहे – ०२२ २४०७६३८१ विस्तारित- २५३.

‘लाइफ (लँडमार्क इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर एम्प्लॉयमेंट) सेंटर फॉर लर्निग डिसेबिलिटी डिपार्टमेंट ऑफ सायकियाट्री’, नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २३०२७६५९

‘महाराष्ट्र डिसलेक्सिया असोसिएशन’, मुंबई, हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५५६५७५४.

‘दृष्टी ह्य़ुमन र्सिोस सेंटर’, मुंबई यांची ‘हेल्प’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक – ९३२३४९६७०४. या क्रमांकावरून काही संस्थांची माहिती दिली जाते.

‘चाइल्डलाइन मुंबई रिसोर्स डिरेक्टरी’ यांचीही अशीच माहिती देणारी हेल्पलाइन आहे. तिचे क्रमांक – ०२२ २३८४१०९८, ०२२ २३८७१०९८, ०२२ २३८८१०९८.

‘गुड समरिटनस् डिरेक्टरी’ यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २२०२१४६२. यांच्याकडूनही संस्थांची माहिती मिळते.

‘डिरेक्टरी ऑफ इंस्टिटय़ूशन फॉर दी पर्सनस् विथ डिसेबिलिटी’, मुंबई यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २५२२०२२३.

‘चाइल्डरिच’ या मुलांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील संस्थेची ‘डिरेक्टरी ऑफ सव्‍‌र्हिसेस फॉर लर्निग डिसेबिलिटी अँड स्लो लर्नर्स’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक आहे – ०२२ २६४९६४४७, ०२२ २६४९८००६.

‘उम्मीद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’, मुंबई यांची ‘उम्मीद डिरेक्टरी ऑफ सव्‍‌र्हिसेस फॉर चिल्ड्रेन विथ डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक – ०२२ ५५२२८३१०, ०२२ ५५२६४०५४.

‘चाइल्डरेज’, मुंबई या संस्थेचे हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४३७७४५७, ९८२०२५६७३१.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com