|
|
सध्या देशभर सुरू असलेल्या स्वाइन फ्लूच्या साथची माहिती आपल्यापर्यंत विविध मार्गानी पोहोचत असते. यामुळे आपण संभ्रमात पडतो. उदाहणार्थ एका वृत्तवाहिनीवर बळींची संख्या २५ तर दुसऱ्या वृत्तवाहिनीवर ती संख्या २८ किंवा २३ अशी असते. मग आकडेवारीबाबत अशी तफावत का निर्माण होते असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा प्रकारच्या आपत्तीच्या वेळेस वृत्तवाहिन्यांची नेहमीच भंबेरी उडते.
यामुळे सहाजिकच सामन्य नागरिक संभ्रमात पडतो, आणि त्याला नेमके काय आहे हे कळतच नाही. याशिवाय पालिका रुग्णालयांमध्ये आपापसात असणारा समन्वय ढासळल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. यासाठी काहीतरी ठोस पर्याय असणे गरजेचे आहे. पालिकेची सर्व रुग्णालये ‘ई-लिंक’ ने एकमेकांशी जोडण्याचा प्रस्ताव जून २००६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. पण अद्याप हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. जर ही सोय आज आपल्याकडे असती तर समन्वयामध्ये प्रशासनाचा गोंधळ उडाला नसता. या सेवेच्या माध्यमातून कस्तुरबा रुग्णालय आणि इतर पालिका रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांच्या परिस्थितीचा आढावा घेता येणे सहज शक्य झाले असते. शिवाय या सर्व रुग्णालयातील डॉक्टरांना एकमेकांशी समन्वय साधणेही सोपे झाले असते. याचबरोबर रुग्णांची नेमकी आकडेवारी, त्यांची आजाराची लक्षणे, परीक्षणाचे निकाल आदी माहिती एका क्लिकवर मिळणे सहज शक्य झाले असते. हा प्रकल्प राबविण्यासाठी सव्र्हर, संगणक याची कोणतीही खरेदी अद्याप झलेली नाही. शिवाय हा प्रकल्प पूर्णपणे सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या ३७२ कर्मचाऱ्यांची नेमणूकही यामध्ये करण्यात आलेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. या प्रकल्पात रुग्णाचा एक बायोमेट्रिक्स आयडी तयार केला जातो. यामध्ये त्या रुग्णाची संपूर्ण माहिती स्टोअर केली जाते. जर त्या रुग्णाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची वेळ आली तर या आयडीद्वारे त्याची संपूर्ण माहिती त्या रुग्णालयाला उपलब्ध होईल. पण नेमके कोणत्या कंपनीला या सर्व प्रकल्पाचे टेंडर द्यायचे अथवा हा प्रकल्प मोडीत काढायचा या वादातच तीनवष्रे उलटून गेली. याशिवाय काही संगणक तज्ज्ञांनी अशा प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रकल्प तयार केले आहेत. यामध्ये व्हीजेटीआयमधील निवृत्त प्रश्नध्यापक जितेंद्र शहा यांनी जीआयएस (कॅर) वर आधारीत एक सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे. या सेवेची महत्त्वाची बाब म्हणजे ही सेवा पूर्णत: ‘ओपनसोर्स’वर अवलंबून असणार आहे. यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी कोणताही वेगळा सव्र्हर खरेदी करण्याची गरज नाही. या सेवेमध्ये रुग्णालयाचे भौगोलिक स्थानदेखील पाहता येणे शक्य होणार आहे. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणावरील सर्व रुग्णांची माहिती एकाचवेळी स्क्रीनवर पाहता येणे शक्य होणार आहे. ज्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची गरज आहे अशा ठिकाणची माहिती या सेवेत तातडीने कळणार आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिक, प्रसारमाध्यमे यांना अधिकृत आणि योग्य माहिती मिळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील या सेवेचा फायदा होणार असल्याचे प्रश्नध्यापक शहा यांनी सांगितले. ही सेवा पोलिसांच्या ‘अॅक्सिडण्ट रिपोर्टिग सिस्टिम’च्या धरतीवर बनविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या सेवेच्या माध्यमातून एखाद्या रुग्णाची इत्यंभूत माहिती मिळणे शक्य होईल. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना केस स्टडीज्साठीही याचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत याची माहितीदेखील या सेवेतून मिळू शकते. जेणेकरुन साथीचा आजार अधिक पसरू नये यासाठी तो भाग काही काळापुरता बंद ठेवता येऊ शकेल. ‘ओपनसोर्स’वर आधारित या सेवेसंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभागात चौकशी केल्यास, ‘आमच्याकडे ओपनसोर्स वर काम करणारे मनुष्यबळ नाही’ असे उत्तर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिले. उत्कृष्ट आणि योग्य आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेला समन्वय योग्य प्रकारे होण्यासाठी तंत्रज्ञानाचे पर्याय आपल्यासमोर असतानाही आपले प्रशासन हे सर्व पर्याय स्वीकारत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? स्वाइन फ्लूची लाट आता आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. पण अशा प्रकारच्या आपत्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी या सर्व पर्यायांची वेळीच अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नीरज पंडित
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|