|
|
|
बीटी वांग्यावरचे आक्षेप बिनबुडाचे
|
|
|
|
|
डॉ. सुभाष आठले - संपर्क ९४२०७७६२४७ प ण्यातील श्री. पी. बी. शितोळे, सतीश बनसोड आणि विक्रम बोके यांनी ‘महाराष्ट्र सेंद्रीय शेती महासंघ (मॉफ)’ च्या वतीने नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले होते. बीटी वांग्याला व्यावसायिक लागवडीस परवानगी मिळाल्यानंतर त्याबाबत घेतलेले विविध आक्षेप व त्यावरील उत्तरे पुढीलप्रमाणे-
१) वांगे पीकाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे- बीटी वाणामुळे वांग्याखालील जमीन व वांग्याचे उत्पादन दोन्ही वाढतीलच. शिवाय ज्यांना विविध कारणांनी साधे वांगे पीक घ्यायचे आहे त्यांना ते बियाणेदेखील कायम मिळतच राहील. दरवेळी नवीन बीटी बियाणे न वापरल्यास दर पिढीला बीटी जीन क्षीण होत जाऊन ४-६ पिढय़ांमध्ये तो पूर्ण नाहीसा होऊन साधे वांग्याचे वाण तयार होईल. २) बीटी वांग्याला परवानगी दिल्यामुळे शेती, पर्यावरण, पशू व मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे- हे धादांत खोटे विधान आहे. यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा पुरावा नाही. शाश्वत दुष्परिणाम शितोळे इ. यांच्या दिव्यदृष्टीनेच दिसले असतील. शाश्वत राहू द्या, तात्पुरते दुष्परिणामदेखील दिसलेले नाहीत. ३) बलाढय़ आंतरराष्ट्रीय बियाणे कंपन्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे- हा फार गंभीर आरोप आहे. माझे शितोळे व बनसोड यांना आव्हान आहे की हा आरोप सिद्ध करुन दाखवावा. पाच रुपयांचे बॉलपेन घेतले की कागदावर खोटे आरोप करणे फारच सोपे असते. खरे तर अशा आरोपांबद्दलचा पुरावा मागणे जबाबदार संपादकाचेच कर्तव्य आहे. तरच जबाबदार पत्रकारिता निर्माण होईल व वृत्तपत्राची विश्वासार्हता वाढेल. १) शेंडा व फळे पोखरणारी अळी- बीटी मुळे फक्त एकाच किडीचे नियंत्रण होते हा बीटीचा चांगला गुणधर्म मानावा लागतो. ज्या विषाचा परिणाम इतर प्रकारच्या किटकांवरदेखील होत नाही त्या विषाचा परिणाम माणूस, सस्तन प्राणी, पक्षी, मासे यांच्यावरही होणार नाही हे उघड आहे. बीटी वांग्यावर थोडेही कीटकनाशक वापरावे लागत नाही. अशा मॉन्सेटोचाही दावा नाही. पण फळाच्या आत दडणाऱ्या अळीवर वरून फवारलेल्या रासायनिक कीटकनाशकाचा परिणाम होत नाही. त्याच अळीचे नियंत्रण बीटीमुळे होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो. २) बीटी कापसावरच फक्त लोकरी मावा, रस शोषणाऱ्या अळ्या हे रोग होतात- हे खरे नाही. साध्या कापसावर हे रोग तितक्याच प्रमाणावर होतात. हवामान, पाळस,. कीटकनाशकांना दाद न देणाऱ्या जाती निर्माण होणे वगैरे अन्य कारणेही रोग वाढण्यास जबाबदार असतात. जीएम पिकांमुळे जैविक व पर्यावरणीय संतुलन बिघडते हा केवळ कल्पित आरोप आहे. तसा अभ्यास अद्यापि झालेलाच नाही. असेही तर्क करून म्हणता येते की कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने बीटी पिकामुळे हे संतुलन सुधारेलच. ३) बीटी जीन विषारी, घातक, नुकसानकारक आहे हा दावा स्वीकारला तर सरळ वाणामुळे व बियाणी स्वस्त झाल्यामुळे बीटी वांग्याचा वापर वाढून नुकसान जास्तच होणार नाही काय? कारण मग शेकडो वर्षांनंतरदेखील बीटी जीन नष्ट होणार नाही. कृषी विद्यापीठांचा बीटी जीन बिनविषारी आहे की काय? ४) जागतिक विरोध- वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास अल्पसंख्य असे फक्त २३ देश वगळता जगातील बहुसंख्य देशांनी जीएम तंत्रज्ञान स्वीकारले आहे. म्हणजे जागतिक विरोध नाही. ५) मुळ्यांमधून सोडलेला स्त्राव एनझाईम्स परागकण यांनी ५-१० कि.मी.पर्यंत नुकसान होणार- या सर्व कल्पित गोष्टी आहेत. बीटीमुळे मोझेईक व्हायरस वाढतात हादेखील खोटा आरोप आहे. शिवाय हे यंत्र अपरिवर्तनीय नाही. नवीन बियाणे विकत न घेतल्यास शेतात तयार झालेल्या बियाण्याची बीटी क्षमता दोन-चार पिढय़ांमध्ये नष्ट होते. तसे पाहता सरळ वाण या बाबतीत जास्त अपरिवर्तनीय ठरते. तरीही शिरोळे व बनसोड सरळ वाणाची भलावण करीत आहेत. ६) इंडियन मेडिकल पार्लमेंटरीयन फोरम- हा राजकीय ग्रुप आहे. शास्त्रीय संस्था नाही. या ग्रुपने काहीही संशोधन केलेले नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनशी या ग्रुपचा काहीही संबंध नाही. लेखकांनी दिलेल्या संकेतस्थळावरदेखील फक्त आरोपच बघायला मिळतात. ही संकेतस्थळे उघडउघड जीएम विरोधी संस्थांनी चालवलेली आहेत. तटस्थ अशा शास्त्रीय संशोधकांनी नाही. जीएम पिकांमुळे कोणतेही आजार अथवा वाईट परिणाम झाल्याचे आढळून आलेले नाही. तसे असते तर आपला जेनेटीक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटीने बीटी वांग्याना परवानगीच दिली नसती. ७) अंधश्रद्धेप्रमाणे अंध- भयगंड पसरविण्याचे काम काही संस्था, व्यक्ती, पत्रकार यांनी सुरू केले आहे. जीएम पिकांची जगाला व भारताला गरज आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होईल. शेतकऱ्यांचे कष्ट व खर्च कमी होतील. उत्पादनवाढ होईल व ग्राहकांना पुरेशी न किडलेली शेती उत्पादने अधिक पौष्टीक धान्ये मिळू शकेल. शेतकऱ्यांचा म्हणजे देशातील ६० टक्के नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावेल, गरिबी कमी होईल.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|