मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> वाडय़ात पी.जे. हायस्कूलमध्ये पोषण आहाराचा काळाबाजार
 

गाथा

 



लोकसत्ता ‘व्हिवा दीवा’
स्पर्धेसाठी अटी व शर्ती

 

फोटो गॅलेरी

वाडय़ात पी.जे. हायस्कूलमध्ये पोषण आहाराचा काळाबाजार Bookmark and Share Print E-mail
वाडा/वार्ताहर
येथील पी.जे. हायस्कूलमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाकडून दिला जाणाऱ्या पोषण आहारातील तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे तालुकापुरवठा अधिकाऱ्याने टाकलेल्या धाडीत उघड झाले आहे.पी.जे. हायस्कूलमध्ये पाचवीत ३५३ विद्यार्थी व सहावी ते आठवीमध्ये ११४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पाचवीतील प्रति विद्यार्थी १०० ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम अन्न शिजवून पोषण आहार देण्याचे शासनाचे धोरण आहे. या शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी पोषण आहार खात नसून, सर्वच विद्यार्थी पोषण आहार खात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते, अशी माहिती मिळाल्याने तालुकापुरवठा निरीक्षक ए.व्ही. आळशी यांनी अचानक या शाळेला भेट दिल्यानंतर २२ क्विंटल तांदूळ अधिक शिल्लक असल्याचे आढळून आले. शिल्लक तांदळाचा नेहमीच काळाबाजार होत असल्याचेही पुरावे आळशी यांना मिळाल्याचे समजते.खर्ची पडलेल्या धान्यापेक्षा २२ क्विंटल धान्य ज्यादा राहिल्याने प्रत्यक्षात नियमाप्रमाणे पूर्ण धान्य शिजवले जात नसल्याचेही या प्रकारामुळे आढळून आले आहे. येथील पोषण आहारासंदर्भात अधिक चौकशी केली असता खिचडीशिवाय विद्यार्थ्यांना अंडे, केळी, बिस्किटे, दूध, खजूर देणे क्रमप्राप्त असताना गेल्या वर्षभरात एक-दोन वेळाच या पोषण आहाराचा पुरवठा केला आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार या पोषण आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाते, तेव्हा या समितीच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का? की त्यांचाही या प्रकारात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पोषण आहार भ्रष्टाचारामध्ये शाळेतील काही कर्मचारी, पदाधिकारीही गुंतलेले असल्याचे समजते. या प्रकाराची योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सेवाभावी संस्थांनी केली आहे.   
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या

दिनदर्शिका

मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१०. भारतीय सौर २० माघ १९३१. मिती माघ वद्य एकादशी २१ क. ५१ मि. मूळ नक्षत्रे ३० क. ५७ मि. धनुचंद्र. सूर्योदय ७।११, सूर्यास्त ६।३५. विजयादशमी.
मेष : दिलासा मिळेल. वृषभ : अडचणी येतील. मिथुन : मार्ग सापडतील. कर्क : दगदगीचा संभव. सिंह : चर्चा उपयुक्त ठरतील. कन्या : कामात गुप्तता ठेवा. तूळ : तडजोडीचे धोरण ठेवा. वृश्चिक : संकल्प सिद्धीस न्याल. धनू : हुशारीने वागा. मकर : जिद्द कायम ठेवा. कुंभ : वेळ मारून न्या. मीन : यशस्वी व्हाल.
शुभराशी : मिथुन, सिंह, मीन.